मुंबई : प्रतापगडच्या पायथ्याशी असलेली अफजलखानाची कबर आणि त्याला अतिक्रमणाचा झालेला विळखा हा जुना प्रश्न होता या संदर्भात राज्य सरकारने धाडसी निर्णय घेऊन अतिक्रमण हटवल्याबद्दल राज्य सरकारचे जाहीर अभिनंदन करीत असल्याची प्रतिक्रिया भाजपा आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केली आहे. अतिक्रमण हटवल्याबद्दल करण्यात आलेल्या जल्लोषात ते सहभागी झाले होते. गेल्या अनेक वर्षांपासून न्यायालयाचे आदेश असतानाही महाविकास आघाडी सरकारने ही अतिक्रमणे हटवली नव्हती, ही अतिक्रमणे हटवून या सरकारने आपले हिंदुत्व सिद्ध केले आहे, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत म्हणजे नसबंदी झालेला वाघ; नितेश राणे यांची टीका
खासदार संजय राऊत यांना जामीन मंजूर झाला आहे. त्यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना "हा कसला वाघ आहे, हा तर मांजरापेक्षा कमी आणि नसबंदी झालेला वाघ म्हणता येईल ? अशा शब्दात आमदार नितेश राणे यांनी राऊत यांच्यावर टीका ( Nitesh Rane attacks on Sanjay Raut ) केली आहे. अफजलखानाच्या कबरी भोवतालच्या अतिक्रमण निर्मूलनाबाबत सरकारचे जाहीर आभार मानत असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
संजय राऊत नसबंदी झालेला वाघ - संजय राऊत यांच्या जामिनावरील सुटकेनंतर अनेक ठिकाणी वाघ परत आलाय अथवा टायगर इज बॅक अशा पद्धतीचे फलक झळकावण्यात आले आहेत. या संदर्भात विचारले असता नितेश राणे म्हणाले की, संजय राऊत यांना वाघ म्हणून वाघाचा अपमान करू नका, त्याला मांजरही म्हणता येणार नाही. बाहेर आल्यानंतर त्याने काय डरकाळी फोडली हे सर्वांनी पाहिलेलच आहे. त्यामुळे फार तर नसबंदी झालेला वाघ असे म्हणता येईल, अशा शब्दात नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली ( Nitesh Rane attacks on Sanjay Raut ) आहे.
कटूता दोन्ही बाजूने संपायला हवी - राजकीय कटूता संपवण्यासंदर्भात चर्चा सुरू असली तरी राजकीय कटुता ही केवळ एका बाजूने संपवून चालत नाही, ती दोन्ही बाजूने संपली पाहिजे. आपण स्वतः न बोलता काही लोकांना पुढे करून बोलायला लावले तर कटुता कशी संपेल, त्यामुळे दोन्ही बाजूंनी प्रयत्न व्हायला हवा. त्यांनी प्रयत्न केला तर आम्हीही नक्कीच करू असे राणे यावेळी म्हणाले.