मुंबई -पंजाब नॅशनल बँकेला तब्बल 13 हजार कोटी रुपयांचा चुना लावून फरार झालेल्या नीरव मोदीला मुंबईतील विशेष न्यायालयाने फरार आर्थिक गुन्हेगार घोषित केले आहे. यामुळे नीरव मोदीच्या अडचणी वाढल्या असून त्याची देशासह परदेशातील संपत्ती जप्त करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
नीरव मोदीच्या नाड्या आवळल्या; फरार आर्थिक गुन्हेगार घोषित
विशेष न्यायालयाने नीरव मोदीला वारंवार कोर्टात हजर राहण्याचे आदेश बजावले होते. मात्र, त्याकडे त्याने दुर्लक्ष केले. त्यानंतर, नीरव मोदीला आर्थिक गुन्हेगार घोषित करण्यात यावे, अशी याचिका इडीकडून कोर्टामध्ये दाखल करण्यात आली होती. गुरुवारी विशेष न्यायालयाने नीरव मोदीला फरार आर्थिक गुन्हेगार घोषित केले आहे.
यापूर्वी, विशेष न्यायालयाने नीरव मोदीला वारंवार कोर्टात हजर राहण्याचे आदेश बजावले होते. मात्र, त्याकडे त्याने दुर्लक्ष केले. त्यानंतर, नीरव मोदीला आर्थिक गुन्हेगार घोषित करण्यात यावे, अशी याचिका इडीकडून कोर्टामध्ये दाखल करण्यात आली होती. त्यासाठी त्याच्या संदर्भातील सर्व पुरावे इडीकडून कोर्टात सादर करण्यात आले होते. यानंतर झालेल्या सुनावणीमध्ये गुरुवारी विशेष न्यायालयाने नीरव मोदीला फरार आर्थिक गुन्हेगार घोषित केले आहे. आता नीरव मोदीची संपत्ती जप्त करण्याची कारवाई केली जाणार आहे.