मुंबई- कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बाहेर जावे लागते. यात त्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे कोकणासाठी एक स्वतंत्र विद्यापीठ झाले पाहिजे, अशी मागणी होत आहे. मात्र, सरकारची याबबत दुटप्पी भूमिका असल्याची टीका भाजपचे शिक्षक आमदार निरंजन डावखरे यांनी केली.
'कोकणच्या स्वतंत्र विद्यापीठासाठी सरकारची दुट्टपी भूमिका' हेही वाचा-राजर्षी शाहू महाराज भारतरत्न पेक्षा मोठे - संभाजीराजे छत्रपती
विधानपरिषदेत आज डावखरे यांनी कोकणला स्वतंत्र विद्यापीठ मिळावे, अशी भूमिका लक्षवेधीमध्ये मांडली.
यावर मंत्री उदय सामंत यांनी उत्तर देताना आश्वासन दिले की, कोकणासाठीच्या स्वतंत्र विद्यापीठासाठी अभ्यास गटाचा निर्णय येईपर्यंत सबसेंटरमध्ये डायरेक्टर दर्जाचे अधिकारी नियुक्त केले जातील. जेणेकरून त्याठिकाणीच निर्णय घेण्याची प्रक्रिया होऊ शकेल.
त्यामुळे आता सरकार दिलेल्या आश्वासनाला जागते का, हे पाहणे गरजेचे ठरणार आहे, असे डावखरे यांनी सांगितले.