महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Balveer Harshika Agrawal : दोनशे डिजिट पर्यंतचा पाई सिद्धांत 23 सेकंदात, नऊ वर्षीय हर्षिकला इतिहास

दोनशे डिजिट पर्यंतचा पाई सिद्धांत 23 सेकंदात तोंडपाठ (reciting Pi theory up to two hundred digits in 23 seconds) म्हणत, नऊ वर्षीय हर्षिका अग्रवालने (Nine year old Harshika made history) इतिहास रचला. तिचं नाव आशिया बुक ऑफ रेकॉर्ड (Asia Book of Records) मध्ये नाव नोंदलं गेलं.

Balveer Harshika Agrawal
हर्षिका अग्रवाल

By

Published : Nov 9, 2022, 3:26 PM IST

मुंबई :भारतात लोकशाही व्यवस्था आहे आणि लोकशाही व्यवस्थेचा परिणाम म्हणून व्यक्ती स्वातंत्र्य राज्यघटनेने बहाल केले आहे. त्यामुळेच घराघरांमध्ये काही प्रमाणात तरी मुलांना स्वातंत्र्य दिलं जातं. मुलांना आवडीच्या विषयात झेप घेण्याची संधी घरामधून दिली जाते; तर अशी संधी हर्षिका अग्रवाल (Nine year old Harshika made history) हिला मिळाली आणि तिने एक रेकॉर्ड (reciting Pi theory up to two hundred digits in 23 seconds) केलं. जाणून घेऊया सविस्तरपणे.

प्रतिक्रिया व्यक्त करतांना हर्षिका अग्रवाल व कुटूंबिय



हर्षिका बोरीवली उपनगरातील मुंबईची मारवाडी कुटुंबातील मुलगी, आई प्रियंका अग्रवाल आणि वडील टीसीएस मध्ये संगणक अभियंते आहेत. झालं असं की, करोनाच्या काळामध्ये तिच्या आईने गणितामधील अनेक अवघड गोष्टी अत्यंत सोप्या पध्दतीने शिकवण्यास सुरुवात केली. त्याचा परिणाम असा झाला की, पाई हा जो सिद्धांत आहे; तो 200 वेळा या मुलीने सहज म्हणून दाखवला आणि ते ही 23.9 सेकंद एवढ्या कमी वेळेत. हे असं म्हणून दाखवणं तितकसं सोपं नाही. मात्र ते साध्य केलं या इवल्याश्या हर्षिका अग्रवाल हिने.



आई प्रियांका अग्रवालने मेमरी संदर्भात काही शिक्षण घेतलेलं होते. आणि सहज घरामध्ये आपल्या मुलांच्या सोबत त्यांनी ते तंत्र वापरायला सुरुवात केली. तर त्याचा परिणाम असा झाला की, पायी हा सिद्धांत जो आपण गणितामध्ये 200 डिजिट पर्यंत डिजिट पर्यंत आहे. पायीच्या सिद्धांत ज्याला पेगा व्हॅल्यूज म्हणतात. ते तिने न पाहता सहज सोप्या पद्धतीने म्हणून दाखवलं.



'मेमरी' अर्थात ही जी गोष्ट आहे की, अमृत पातळीवर आतल्यात मेंदूमध्ये मोजमाप करणं आणि आपण आधी काही म्हटलेलं असेल काही कृती केलेली असेल तर ते आठवणं आणि त्याच्यासह व्यक्त होणे. अशातली ही बाब आहे .पण आई प्रियांका यांनी तिच्याकडनं कसोशीने तयारी करून घेतली आणि तिचं आशिया बुक ऑफ रेकॉर्ड (Asia Book of Records) मध्ये नाव नोंदलं गेलं.



या संदर्भात हर्षिकाच्या आईसोबत ईटीव्ही भारतने संवाद साधताना, आई प्रियांका यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं की, 'कोरोनाच्या काळामध्ये विशेष करून घरामध्ये अधिक राहत होतो आणि मी काही गणितातले अवघड मुद्दे कसे सुटावे म्हणून तंत्र शिकले होते. आणि मुलांसोबत घेऊन मी ते तंत्र शिकवलं. ज्याला आपण इंग्रजीमध्ये पेगा व्हॅल्यूज म्हणतो. म्हणजे पाई हा सिद्धांत जो आहे तो 200 डिजिट पर्यंत त्याचे जे गणिती मापन आहे. ते हीने म्हणून दाखवलं आणि ते अत्यंत कमी वेळामध्ये म्हणून दाखवलं .त्यामुळे तिचा रेकॉर्ड झाला. आणि हर्शिकाने ही किमया 23.9 सेकंद मध्ये पूर्ण केली आणि ही सहसा लहान मुलं करत नाही पण ते तिने केलं.'



हर्षिकाला तिच्या आईने प्रोत्साहन दिल. वेळोवेळी हे तंत्र अवगत करावं म्हणून त्याची पद्धती शिकवली आणि हर्शिका ने देखील आईने शिकलेल्या गोष्टींचा पाठपुरावा केला. त्याच्यामुळे एखाद्या गोष्टीवर सातत्य असणं, एकाग्र होणं ही बाब हर्शिका मध्ये फार महत्त्वाची असल्याचे स्पष्ट झालं. प्रत्येक घरामधून या रीतीने मुलं आणि मुली आपले सुप्त गुण दाखवायला लागले, तर निश्चित भारत एक जगावरील आगळावेगळा देश होणार यात काही शंका नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details