मुंबई -माजी खासदार निलेश राणे यांनी आमदार उदय सामंत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. आरोग्य सेवेच्या सुविधेवरुन त्यांनी उदय सामंतांना लक्ष्य केले आहे. उदय सामंत हे रत्नागिरी मतदारसंघाचे डांबर चोर आमदार असल्याचे राणेंनी म्हटले आहे.
डांबर चोर आमदाराने १५ वर्षात काहीही विकास केला नाही, निलेश राणेंचा सामंतांवर निशाणा - माजी खासदार निलेश राणे
माजी खासदार निलेश राणे यांनी आमदार उदय सामंत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. आरोग्य सेवेच्या सुविधेवरुन त्यांनी उदय सामंतांना लक्ष्य केले आहे.
निलेश राणेंचा उदय सामंतांवर निशाणा
उदय सामंत हे गेल्या १५ वर्षापासून आमदार आहेत. पण मतदारसंघात सांगण्यासारखी एकही वास्तू उभारली नाही. त्यांनी या काळात काहीही विकास केला नसल्याचे निलेश राणेंनी म्हटले आहे. आता निलेश राणेंच्या टीकेला आमदार उदय सामंत या उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.