महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

...मग झेड सुरक्षा कशाला, निलेश राणेंचा ठाकरेंवर निशाणा - Nilesh Rane on z+ security

सुरक्षेच्या मुद्यावरुन माजी खासदार निलेश राणे यांनी युवा सेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरे यांची सुरक्षा Y+ वरुन  Z करण्यात आली आहे. हा सत्तेचा दुरुपयोग असून, महाराष्ट्राच्या जनतेला पटणार नसल्याचे म्हणत निलेश राणेंनी आदित्य यांच्यावर टीका केली आहे.

Nilesh Rane critisim on Aadity Thackeray
निलेश राणेंचा ठाकरेंवर निशाणा

By

Published : Dec 25, 2019, 5:19 PM IST

मुंबई - सुरक्षेच्या मुद्यावरुन माजी खासदार निलेश राणे यांनी युवा सेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरे यांची सुरक्षा Y+ वरुन Z करण्यात आली आहे. हा सत्तेचा दुरुपयोग असून, महाराष्ट्राच्या जनतेला पटणार नसल्याचे म्हणत निलेश राणेंनी आदित्य यांच्यावर टीका केली आहे.

आदित्य ठाकरे यांच्या अंगावर एकही पोलीस केस नाही, कोणाची धमकी नाही, मग Z सुरक्षा कशाला असा सवाल निलेश राणेंनी उपस्थित केलाय. त्यांनी ट्वीटरच्या माध्यमातून आदित्य ठाकरेंना लक्ष्य केले.

उद्धव ठाकरे म्हणजे शरद पवार यांच्या हातातील कटपुतली

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणजे शरद पवार यांच्या हातातील कटपुतली असल्याचा घणाघात निलेश राणे यांनी केला. राज्याचे मंत्रिमंडळ विस्ताराचे घोडे नेमके कुठे अडकले. मंत्रीपद, शेतकऱ्यांना कर्जमाफी आदी विषयांवरुन राणेंनी ठाकरेंना लक्ष्य केले.

ABOUT THE AUTHOR

...view details