महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

...मग राज्य सरकार हवचं कशाला? निलेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल - नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे मदतीची मागणी

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे मदतीची मागणी केली आहे. यावरुन माजी खासदार निलेश राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. सगळं केंद्र सरकारने दिल्यावर महाराष्ट्र सरकार देणार, तर मग राज्य सरकार हवच कशाला??? असा सवाल राणेंनी उपस्थित केला आहे.

Nilesh Rane criticism on Uddhav thackeray
निलेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

By

Published : Dec 18, 2019, 5:21 PM IST

मुंबई - नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे मदतीची मागणी केली आहे. यावरुन माजी खासदार निलेश राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. सगळं केंद्र सरकारने दिल्यावर महाराष्ट्र सरकार देणार, तर मग राज्य सरकार हवच कशाला??? असा सवाल राणेंनी उपस्थित केला आहे.

राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकरी आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडे १४ हजार ६०० कोटी रुपयांची मागणी केली आहे. या मागणीवरुन निलेश राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले आहे. तसेच मुख्यमंत्र्यानी या अगोदर फक्त मुंबई महापालिकेची टक्केवारी बघितली आहे. इतर कारभार त्यांना माहीत नसल्याचेही राणेंनी म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details