महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

७ वर्षात बाळासाहेबांना शोभेल असे एकही स्मारक नाही, निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा - निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

काही केल्या राणे - ठाकरे वाद मिटायला तयार नाही. सतत काही ना काही कारणावरुन या दोन घराण्यांमध्ये राजकीय वाकयुद्ध रंगताना दिसते. अशातच आता माजी खासदार निलेश राणेंनी केलेल्या एका वक्तव्याने नव्या वादाला तोडं फुटण्याची शक्यता आहे.

निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

By

Published : Nov 17, 2019, 10:17 PM IST

मुंबई - काही केल्या राणे - ठाकरे वाद मिटायला तयार नाही. सतत काही ना काही कारणावरुन या दोन घराण्यांमध्ये राजकीय वाकयुद्ध रंगताना दिसते. अशातच आता माजी खासदार निलेश राणेंनी केलेल्या एका वक्तव्याने नव्या वादाला तोडं फुटण्याची शक्यता आहे. निलेश राणेंनी ट्वीटरच्या माध्यमातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले आहे.

आज दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची ७ वी पुण्यतिथी आहे. यानिमित्त राज्यभर अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम होत आहेत. मात्र, अशातच निलेश राणेंनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. बाळासाहेब ठाकरे जाऊन ७ वर्ष झाली तरी अद्याप बाळासाहेबांना शोभेल अशी एकही वास्तू किंवा स्मारक झाले नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. या मुद्यावरुन निलेश राणेंची जीभ घसरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details