मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर माजी खासदार निलेश राणेंनी निशाणा लगावला आहे. कलीयुगात महाभारत आणि रामायण एकत्र बघायचा योग आला असून, महाभारतातला दुर्योधन रामाला भेटायला गेल्याचे निलेश राणेंनी म्हटले आहे. तसेच राम मंदिरासाठी फक्त १ कोटी आणि मुलाच्या पेंग्विन हट्टासाठी ४५ कोटी? असा सवाल राणेंनी केला आहे.
राम मंदिरासाठी फक्त १ कोटी आणि मुलाच्या पेंग्विन हट्टासाठी ४५ कोटी?
माजी खासदार निलेश राणेंनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. मुख्यमंत्र्यांचा अयोध्या दौरा म्हणजे कलीयुगातला दुर्योधन रामाला भेटायला गेल्याचे राणेंनी म्हटले आहे. तसेच राम मंदिराच्या उभारणीसाठी शिवसेनेने १ कोटी रुपये दिले, त्यावरूनही निलेश राणेंनी मुख्यमंत्र्यांना लक्ष केले आहे.
निलेश राणेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा काल (शनिवार) अयोध्या दौरा झाला. यावेळी त्यांनी रामलल्लाचे दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्र्यासोबत खासदार, मंत्रीही उपस्थित होते. मात्र, कोरोना व्हायरसचे सावट असल्याने, उत्तर प्रदेश सरकारने सेनेला शरयू नदीकिनारी महाआरती करण्यास परवानगी नाकारली होती. यावेळी उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत शिवसेनेकडून राम मंदिराच्या उभारणीसाठी १ कोटी रुपयांची घोषणा केली. यावरूनच निलेश राणेंनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.