महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

म्हाडा ही सर्वात बोगस संस्था, ४० हजार घरांची भेट म्हणजे निवडणुकीचं चॉकलेट - निलेश राणे - ४० हजार घरांची भेट

मुंबईकरांना ४० हजार घरांची भेट म्हणजे निवडणुकीचं चॉकलेट असल्याचे म्हणत माजी खासदार निलेश राणेंनी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणवर (म्हाडा)  निशाणा साधला.

निलेश राणेंचा म्हाडावर निशाणा

By

Published : Jul 26, 2019, 2:09 PM IST

मुंबई -मुंबईकरांना ४० हजार घरांची भेट म्हणजे निवडणुकीचं चॉकलेट असल्याचे म्हणत माजी खासदार निलेश राणेंनी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणवर (म्हाडा) निशाणा साधला. ही सर्वात बोगस संस्था असल्याचेही राणे म्हणाले.

आजपर्यंत म्हाडाने जेवढी घरं जाहीर केली तेवढी दिली असती, तर म्हाडाकडून शिकण्यासाठी हॉवर्ड विद्यापीठाचे कुलगुरू भारतात आले असते. म्हाडा ही सर्वात बोगस संस्था आहे. निवडणुका जवळ आल्या आहेत म्हणून घरं देण्याची घोषणा केल्याचे राणे म्हणाले.

गोरेगाव पश्चिमेतील मोतीलालनगरमध्ये म्हाडाकडून हाती घेण्यात येणाऱ्या पुनर्विकासातून तब्बल ४० हजार घरांचा प्रचंड साठा मुंबईकरांच्या हाती येणार आहे. त्यामुळे मुंबईतील घरांच्या वाढीव किंमतीत घट होतानाच गृहसाठ्यांची कमतरताही भरून निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details