महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आज.. आत्ता... मंगळवारी रात्री 12 पर्यंत महत्त्वाच्या घडामोडींवर एक नजर... - एक नजर...

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेत सैराट चित्रपटातील गीताचा आधार घेत सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली होती. या टीकेला उत्तर देताना आज अर्थमंत्री सुधीर मुनंगटीवार यांनीही त्याच गीताचा आधार घेत विरोधकांवर पलटवार केला. तर एसटीच्या भरतीमध्ये आत्महत्याग्रस्त आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच अमरावतीमध्ये पैशासाठी आपल्या पोटच्या गोळ्याला विकून टाकणाऱ्या बापाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर जांभुळखेडा भूसुरुंग स्फोटाप्रकरणी आणखी तिघांना अटक करण्यात आली असून आरोपींची संख्या आता 7 वर पोहोचली आहे आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान.

आज.. आत्ता... मंगळवारी रात्री 12 पर्यंत महत्त्वाच्या घडामोडींवर एक नजर...

By

Published : Jun 25, 2019, 11:56 PM IST

जयंत पाटलांच्या झिंगाट टिकेला अर्थमंत्र्यांचे झिंगाट उत्तर, म्हणाले...

मुंबई - राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेत सैराट चित्रपटातील गीताचा आधार घेत सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली होती. या टीकेला उत्तर देताना आज अर्थमंत्री सुधीर मुनंगटीवार यांनीही त्याच गीताचा आधार घेत विरोधकांवर पलटवार केला. 'त्यांच्या उरात होतीय धडधड , ज्यांची सत्ता क्षणात गेली... जनतेच्या रागाची झाली बाधा, घड्याळं हातात फुटून गेली.... राहुलच्या खेम्यात, राष्ट्रवादीच्या कोमात अन राज ही रडतोया' असे म्हणत मुनगंटीवार यांनी काँग्रेस राष्ट्रवादीसह राज ठाकरेंवरही निशाणा साधला. वाचा सविस्तर

खूशखबर... एसटीच्या भरतीमध्ये आत्महत्याग्रस्त आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना प्राधान्य

मुंबई - दुष्काळग्रस्त १२ जिल्ह्यातील ४४१६ तसेच कोकणातील जिल्हे वगळता इतर ९ जिल्ह्यांतल्या ३६०६ अशा एकूण राज्य परिवहन महामंडळामध्ये ८०२२ चालक आणि वाहकांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून या भरतीमध्ये दुष्काळग्रस्त जिल्ह्यांतील उमेदवारांना तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना प्राधान्य देण्यात येणार आहे. याबाबतची माहिती परिवहन मंत्री रावते यांनी विधानसभेत दिली. वाचा सविस्तर

दगडाचे काळीज.. पोटच्या मुलाला अडीच हजारात विकणाऱ्या निर्दयी जन्मदात्याला अटक

अमरावती - पैशासाठी आपल्या पोटच्या गोळ्याला विकून टाकणाऱ्या बापाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सुहास चिमटे असे या बापाचे नाव आहे. मुलगा सांभाळणे मुश्किल झाल्याचे सांगत त्याला फक्त ५ हजारात विक्री करायला निघालेला दगडाच्या काळजाचा बाप मूळचा अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्याचा रहिवासी आहे. वाचा सविस्तर

जांभुळखेडा भूसुरुंग स्फोटप्रकरणी आणखी तिघांना अटक; आरोपींची संख्या सातवर

गडचिरोली - कुरखेडा तालुक्यातील जांभुळखेडा येथे 1 मे रोजी नक्षल्यांनी भुसुरूंग स्फोट घडवून आणला होता. या स्फोटात 15 जवान व एका खासगी वाहन चालक वीरमरण आले होते. यानंतर घटनेची मास्टरमाईंड नर्मदाक्का व तिचा पती किरण याला 11 जूनला गडचिरोली पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्याकडून घटनेचा तपास सुरू असताना स्फोटाच्या कटात सहभागी असलेल्या आणखी तिघांना रविवारी अटक करण्यात आली. यामुळे या घटनेतील आरोपींची संख्या आता सातवर पोहोचली आहे. वाचा सविस्तर

ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान, इंद्रायणीकाठ भक्तीरसात तल्लीन

पुणे - हरिनामाच्या जयघोषात संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आज सायंकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले. यावेली लाखो भाविक हरिनामाच्या गजरात दंग झाले होते. यावेळी इंद्रायणीकाठ भक्तीरसात तल्लीन झाला होता. वाचा सविस्तर

ABOUT THE AUTHOR

...view details