महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आज...आत्ता...शनिवारी रात्री 12 पर्यंत महत्वाच्या घडामोडींवर एक नजर... - एक नजर...

CW IND vs AFG : अफगाणिस्तानने दाखवला लढाऊ बाणा.. परंतु अखेर शमीच्या हॅटट्रिकने विजय भारताचाच...तर बुलडाण्यात वादळी वाऱ्याने घरावर झाड कोसळून मातेसह २ चिमुरड्यांचा दुर्दैवी अंत तसेच अर्थव्यवस्था गतिमान करण्यासाठी पंतप्रधान मोदींची देशातील अर्थतज्ज्ञांबरोबर चर्चा तर मला जर माण मतदारसंघ दिला नाही तर मुख्यमंत्र्यांकडून मी नागपूरची जागा मागून घेणार असल्याचे वक्तव्य पशुसंवर्धन व दुग्ध विकासमंत्री महादेव जानकर यांनी केले. त्याबरोबरच नांदेड जिल्ह्यात गेल्या चार वर्षांपासून दुष्काळ शेतकऱ्याच्या पाचवीला पुजलेला आहे.

आज...आत्ता...शनिवारी रात्री 12 पर्यंत महत्वाच्या घडामोडींवर एक नजर...

By

Published : Jun 22, 2019, 11:54 PM IST

CW IND vs AFG : अफगाणिस्तानने दाखवला लढाऊ बाणा.. परंतु अखेर शमीच्या हॅटट्रिकने विजय भारताचाच

साऊदम्पटन - भारत विरुद्ध अफगाणिस्तानच्या यांच्यातील विश्वकरंडकातील २८ व्या सामन्यात अफगाणी फिरकीपुढे टीम इंडियाने लोटांगण घातले. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली होती. मात्र अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत भारताला २२४ धावांमध्ये रोखले. वाचा सविस्तर

बुलडाण्यात वादळी वाऱ्याने घरावर झाड कोसळून मातेसह २ चिमुरड्यांचा दुर्दैवी अंत

बुलडाणा - खामगाव तालुक्यातील घाटपुरीतील आनंदनगर येथे वादळी वाऱ्यामुळे घरावर निबांचे झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेत आईसह दोन चिमुरड्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आई शारदा गुणवंत हिरडकर (वय २८) सुष्टी गुणवंत हिरडकर (वय ३) ऋषिकेश गुणवंत हिरडकर (वय २) असी त्या मायलेकरांची नावे आहेत. या तिघांचाही मृतदेह क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले. वाचा सविस्तर

अर्थव्यवस्था गतिमान करण्यासाठी पंतप्रधान मोदींची देशातील अर्थतज्ज्ञांबरोबर चर्चा

नवी दिल्ली - पुढील महिन्यात सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी अर्थतज्ज्ञ आणि उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांसह चर्चा केली. सध्याच्या आर्थिक स्थितीबद्दल त्यांच्याशी चर्चा करून त्यांची मते जाणून घेतली. ५ जुलैला नव्या सरकारकडून या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेत अर्थसंकल्प मांडतील. वाचा सविस्तर

माण मतदारसंघ दिला नाही तर, मुख्यमंत्र्यांचं नागपूर घेणार - महादेव जानकर

सातारा - मला जर माण मतदारसंघ दिला नाही तर मुख्यमंत्र्यांकडून मी नागपूरची जागा मागून घेणार असल्याचे वक्तव्य पशुसंवर्धन व दुग्ध विकासमंत्री महादेव जानकर यांनी केले. माझा लाड मुख्यमंत्री पूर्ण करतील असेही जानकर म्हणाले. तसेच आगामी विधानसभेला आम्ही भाजपच्या तिकीटावर लढणार नसून, रासपच्या तिकीटावर लढणार असल्याचे त्यांनी सांगितले. वाचा सविस्तर

नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्याचे दुष्काळाशी दोन हात; स्वतःच खोदली ३५ फूट विहीर..!

नांदेड - जिल्ह्यात गेल्या चार वर्षांपासून दुष्काळ शेतकऱ्याच्या पाचवीला पुजलेला आहे. अनेक शेतकऱ्यांनी नापिकी व कर्जबाजारीपणामुळे स्वतःचे जीवन संपविले आहे. परंतु, अर्धापूर तालुक्यातील चेनापूर गावच्या शेतकरी दाम्पत्य दुष्काळाला पुरुन उरले आहे. किशन मार्कंड असे या शेतकऱ्याचे नाव असून सालगडी ते बागायतदार शेतकरी असा त्यांचा प्रवास आहे. त्यांनी कुटुंबीयांच्या मदतीने ३५ फूट विहीर खोदून दुष्काळाशी दोन हात केले. वाचा सविस्तर

ABOUT THE AUTHOR

...view details