नितीश कुमारांसोबत 'इफ्तार पार्टी'चे फोटो ट्वीट केल्यामुळे अमित शाह भाजप मंत्र्यावर नाराज
नवी दिल्ली - लोकजनशक्ती पार्टीचे अध्यक्ष रामविलास पासवान यांनी इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीला भाजपचे केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह आणि नितीश कुमार यांनी हजेरी लावली होती. पार्टीनंतर गिरिराज सिंह यांनी ट्वीटरवर नितीश कुमारांची प्रशंसा केली. यामुळे चिडलेल्या अमित शाह यांनी फोन करून गिरिराज सिंह यांना नितीश कुमारांबाबत अशाप्रकारे वक्तव्ये करू नका म्हणून बजावले आहे. वाचा सविस्तर
माता न तू वैरिणी...चालत्या बसमध्ये बाळाला जन्म देऊन आई पसार
यवतमाळ - पांढरकवडा आगाराच्या बसमध्ये मंगळवारी सायंकाळी मातृत्वाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली. एका महिलेने चालत्या एसटी बसमध्येच बाळाला जन्म दिला. त्यानंतर कोणाचेही आपल्याकडे लक्ष नाही, याची खात्री करून ती महिला नवजात बाळाला तिथेच सोडुन पसार झाली. वाचा सविस्तर
गृह मंत्रालयाकडून सर्वात धोकादायक १० दहशतवाद्यांची यादी जाहीर
नवी दिल्ली - गृहमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर अमित शाह यांनी गुप्तचर यंत्रणा आणि सुरक्षा यंत्रणेसोबत बैठक बोलावली. यावेळी त्यांनी काश्मीरच्या राज्यपालांसोबतही चर्चा केली. यानंतर काश्मीरमधील सर्वात धोकादायक 10 दहशतवाद्यांची यादी तयार करण्यात आली आहे. सुरक्षा दलाच्या जवानांना यांचा बंदोबस्त करण्यासाठी सांगण्यात आले आहे. वाचा सविस्तर
पुण्यात ईदनिमित्त बाजारपेठा फुलल्या; मुस्लीम बांधवांची खरेदीसाठी लगबग
पुणे - मुस्लीम बांधवांचा पवित्र सण रमजान ईद चंद्र दर्शन झाल्याने बुधवारी साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवानिमित्त शहरातील बाजारपेठांमध्ये मुस्लीम बांधवांची खाद्यपदार्थ आणि कपडे खरेदीसाठी लगबग पाहायला मिळत आहे. पुण्यातील कॅम्प, कोंढवा, आणि मोमिनपुरा परिसरामध्ये मुस्लीम बांधवांनी विविध प्रकारचे पोशाख, शीरखुर्माच्या शेवया, खजूर, फळे, आदी वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी केली होती. वाचा सविस्तर
१२ वी विद्यार्थ्यांच्या निकालासंबंधी धनंजय मुंडेनी घेतली मुख्यमंत्र्याची भेट
मुंबई - बारावीच्या दोषपूर्ण निकालामुळे मुंबईतील शेकडो विद्यार्थ्यांची इंजिनिअरिंग, मेडिकल, औषध निर्माण, आर्किटेक्चर व तत्सम शैक्षणिक अभ्यासक्रमांची संधी हुकण्याची भीती निर्माण झाली आहे. या विद्यार्थ्यांच्या समस्येसंदर्भात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज विद्यार्थी आणि पालकांसह मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावर्षी परिक्षा मंडळाकडून डाटा फिडींगमध्ये त्रुटी राहिल्याने राज्यात लागलेला बारावीचा निकाल हा दोषपूर्ण असल्याची बाब पुढे आली आहे. विज्ञान शाखेतील निकालात तब्बल ३.५ टक्केनी घट झाली आहे. वाचा सविस्तर