मुंबई : महाराष्ट्र कारागृह व सुधार सेवा विभागाने राज्यातील कारागृहांमध्ये असलेल्या कैद्यांना कुटुंबीयांशी आणि नातेवाईकांशी संपर्क साधण्यासाठी ई -प्रिजन यंत्रणेद्वारे व्हिडिओ कॉलिंग सुविधा उपलब्ध करून दिली आहे मात्र विदेशी कैद्यांना ही सुविधा उपलब्ध नव्हती. कारागृह महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी चार जुलैला परिपत्रक जारी करत पाकिस्तानी. बांगलादेशी आणि दहशतवादी कारवायात तुरुंगात कैद असलेल्या कैद्यांना वगळता इतर परदेशी कैद्यांना ही सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश जारी केले.
पहिला काॅल नायजेरियात : स्थानिक कैद्यां पाठोपाठ परदेशातील कायद्यानेही व्हिडिओ कॉल द्वारे कुटुंबीयांशी संपर्क साधण्यासाठी ग्रीन सिग्नल मिळतात आर्थर रोड येथील मध्यवर्ती कारागृहातून प्रथमच परदेशात व्हिडिओ कॉल लावण्यात आला. नायजेरियन कैद्याने थेट नायजेरियातील त्याच्या कुटुंबीयांशी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधत संवाद साधला.
637 परदेशी कैदी : राज्यातील विविध कारागृहात एकूण 637 परदेशी कैदी आहेत. मुंबई नवी मुंबई आणि इतर शहरातील कारागृहात या कैद्यांचे प्रमाण अधिक आहे. कारागृहात प्रामुख्याने नायजेरियन, बांगलादेशी, केनियन, कोलंबियन, इराण, इराक, ब्रिटन, ग्रीस, गिनी, घाणा, ब्राझील, थायलंड, युगांडा, चीन, पाकिस्तान, नेपाळ आदी देशातील कैद्यांचा समावेश आहे.
कायदेशीर मदतीसाठी मदत : कैद्यांचे नातेवाईक अथवा वकील प्रत्यक्ष भेटून चौकशी करण्यास येऊ शकत नसल्याने अशा कायद्यांना कायदेशीर मदत मिळण्यास आणि कारागृहातून सुटका होण्यास अडचणी निर्माण होतात ही सुविधा करून दिल्याने त्यांना कायदेशीर मदत मिळण्यास त्याचप्रमाणे कारागृहातून लवकर सुटका होण्यास मदत होईल त्यामुळे कारागृहातील कैद्यांची गर्दी थोड्याफार प्रमाणात कमी होण्याची शक्यता असल्याचे कारागृह प्रशासनाचे म्हणने आहे.