मुंबई:स्थानिक इक्विटी मार्केट बीएसई, सेन्सेक्स आणि निफ्टी शुक्रवारी वाढीसह सुरू झाले. सकारात्मक जागतिक संकेताचा परिणाम बाजारात पहायला मिळाला. बाजार उघडताच निफ्टी फ्युचर्स सिंगापूर एक्स्चेंजवर 65 अंक म्हणजे 0.4 टक्क्यांनी वाढून 17 हजार 308 वर व्यवहार करत होता, परिणामी एनएसई निफ्टी देखील 17300 च्या पातळी वर सुरू झाली. मागील सत्रात, बीएसई सेन्सेक्स 701 अंकांनी म्हणजे 1.23% वाढून 57 हजार 521 वर बंद झाला होता.
Share Market Today : सकारात्मक जागतिक संकेतांमुळे निफ्टी 17300 वर, तर सेन्सेक्सची 200 अंकांची उसळी - Sensex
सकारात्मक जागतिक संकेतामुळे शेअर मार्केट मधे (Share Market Today) आज निफ्टी 17,300 अंकावर (Nifty tops 17300) उघडला गेला तर सेन्सेक्सने बाजार उघडताच 200 अंकाची उसळी (Sensex jumps ) घेतली.
तर एनएसई निफ्टी 206 अंकांनी म्हणजे 1.21% वाढून 17.245 वर स्थिरावला होता. आशियाई शेअर बाजार शुक्रवारी सुरुवातीच्या व्यवहारात वॉल स्ट्रीटवर रात्रभर वाढल्यानंतर उच्च पातळीवर व्यवहार करताना दिसला. वॉल स्ट्रीटवरील व्यापारात, डाऊ जोन्स इंडस्ट्रियल सरासरी 1.85% वाढली, शेअर मार्केट मधे आज निफ्टी 17,300 अंकावर उघडला गेला तर सेन्सेक्सने बाजार उघडताच 200 अंकाची उसळी घेतली होती.
हेही वाचा : Today Petrol- Diesel Rates : पेट्रोल-डिझलच्या दरात स्थिरता; वाचा आजचे दर