मुंबई : सचिन वाझेने (Sachin Vaze) तळोजा तुरुंगात (taloja jail) सुरक्षा रक्षकाला धमकावलं आहे. याप्रकरणी एनआयएकडून (NIA) न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. वाझे सध्या नवी मुंबईतील तळोजा मध्यवर्ती कारागृहात कैद आहे. त्याने कारागृहातील सुरक्षारक्षकांसोबत असभ्य वर्तन केले, त्यांना धमकीही दिली, असा आरोप करत तळोजा तुरुंग प्रशासनाने वाझेविरोधात मुंबईतील सत्र न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. तुरुंग प्रशासनाच्या तक्रारीमुळे आपल्या अडचणींमध्ये मोठी वाढ होऊ शकते हे लक्षात येताच वाझेने सत्र न्यायालयात माफी मागितली. मात्र, आता एनआयए याबाबत न्यायालयात तक्रार दाखल केली आहे.
Sachin Vaze : वाझेंची तुरुंगातही दादागिरी; सुरक्षारक्षकाला धमकावले - वाझेने सत्र न्यायालयात माफी मागितली
तळोजा तुरुंगात (taloja jail) कैद असलेल्या माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) विरोधात तुरुंग प्रशासनाने तक्रार दाखल केली आहे. वाझेने तुरुंगात सुरक्षारक्षांसोबत असभ्य वर्तन केल्याचा आरोप तुरुंग प्रशासनाने लगावला आहे.
वाझे याचा जबाब विश्वासार्ह नाही -प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर स्फोटके पेरणे आणि ठाण्याचे व्यावसायिक मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील आरोपी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याचा जबाब विश्वासार्ह नाही, तपास यंत्रणेने सादर केलेल्या पुराव्यांवरून राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख कदाचित दोषी ठरणार नाहीत, असे महत्त्वाचे निरीक्षण उच्च न्यायालयाने देशमुख यांची जामिनावर सुटका करताना नोंदविले होते.
उपचारासाठी रुग्णालयात नेले नाही - सचिन वाझेने कोर्टात उत्तर देण्यासाठी वेळ मागितला असून मला डोळे आलेले असताना उपचारासाठी रुग्णालयात नेले नाही, असा आरोप सचिव वाझे याने केला आहे. वाझेने तुरुंग प्रशासनावर बोट उचलत हा आरोप केला आहे. फेब्रुवारी-मार्च २०२१ दरम्यान मुंबईतील बार व रेस्टॉरंट मालकांकडून वसूल केलेले १.७१ कोटी रुपये देशमुख यांचे स्वीय सहायक कुंदन शिंदे यांच्याकडे जमा केल्याचे सचिन वाझे याने जबाबात म्हटले आहे. मात्र, वाझे याचा जबाब खात्रीलायक नाही, अशी टिपणी न्या. निजामुद्दीन जमादार यांच्या एकलपीठाने केली होती.