मुंबई NIA Court Reject Salim Qureshi Bail :सलीम कुरेशी याचा जामीन अर्ज एनआयए न्यायालयानं बुधवारी फेटाळून लावला आहे. दाऊद टोळीमध्ये तो सहभागी होता आणि दहशतवादी कृत्य केल्याचे अनेक तथ्य समोर येतात, असा राष्ट्रीय तपास संस्थेचा दावा एनआयए ( NIA Raid ) न्यायालयानं मान्य केला. त्यामुळे सलीम कुरेशीचा जामीन न्यायाधीश बी डी शेळके यांनी बुधवारी फेटाळून लावला आहे.
दाऊद टोळीकडून दहशतवादी कारवाया केल्याचं उघड :सलीम कुरेशीनं दाऊदच्या टोळीमध्ये दहशतवादी कारवाया केल्याचं उघड झालं आहे. गुंड छोटा शकील याचा मित्र सलीम कुरेशी याच्या संदर्भात राष्ट्रीय तपास संस्थेनं त्यांच्याकडं सकृत दर्शनी पुरावे असल्याचा दावा न्यायालयात केला होता. त्या पुराव्यांमध्ये सलीम कुरेशी हा दहशतवादी कार्यामध्ये सामील असून भारतात आणि विदेशात दहशतवादी कृती केल्याचे सकृतदर्शनी पुरावे असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे त्याचा जामीन अर्ज एनआयए न्यायालयानं बुधवारी नाकारला आहे.
दहशतवादी टोळी सक्रिय नसल्यानं द्या जामीन :सलीम कुरेशीचे वकील विकार राजगुरू यांनी एनआयए न्यायालयात सलीमची बाजू मांडली. 'सलीम कुरेशीवर ठेवण्यात आलेले आरोपाप्रकरणी त्यानं एका वर्षापेक्षा अधिक काळ तुरुंगावास भोगला आहे. 2004 च्यानंतर टोळी विरोधात कोणतेही आरोपपत्र दाखल केलेलं नाही. शिवाय 2004 या काळानंतर दहशतवादी टोळी कुठंही सक्रिय दिसत नाही. त्यामुळेच सलीम कुरेशीला जामीन मिळायला हवा' असा युक्तीवाद सलीम कुरेशीचे वकील विकार राजगुरु यांनी केला आहे.