मुंबई -भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषद प्रकरणातील फरार आरोपी प्रकाश उर्फ रितुपन गोस्वामी, गणपथी उर्फ मुपल्ला लक्ष्मणराव या दोन फरार आरोपींविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. राष्ट्रीय तपास संस्था कायद्यांतर्गत विशेष न्यायालयाने हे अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. वॉरंटच्या अंमलबजावणीसाठी विशेष पथक नेमण्याचे निर्देशही दिले आहेत. दरम्यान, एनआयएने 7 डिसेंबर रोजी वॉरंट जारी करण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. त्यांनी आपल्या याचिकेच्या समर्थनार्थ तपास अधिकाऱ्याने प्रतिज्ञापत्रही सादर केले होते. या अर्जावर न्यायालयाने एनआयएच्या सरकारी वकिलांचे युक्तिवादानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. आज गुरुवार (दि. 15 डिसेंबर)रोजी या संदर्भातील निकाल देत या दोन्ही विरोधात अजामीन पात्र वारण जारी करण्यात आले आहे.
इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या क्लोन प्रती उपलब्ध - एल्गार परिषद प्रकरणात बेकायदेशीर कृत्ये कायद्याअंतर्गत 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील दोन आरोपी जामीनावर बाहेर आहे. या प्रकरणातील सात आरोपींना (2018)पासून तर सहा जण (2020)पासून न्यायालयीन कोठडीत आहेत. जोपर्यंत त्यांच्याकडून जप्त केलेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या क्लोन प्रती उपलब्ध करून दिल्या जात नाही, तोपर्यंत न्यायालय खटला पुढे करू शकत नाही.