मुंबई:अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमच्या (Dawood Ibrahim) नावाने खंडणी उकळल्याच्या आरोपावरून अटक केलेल्या सलीम फ्रुटविरोधात (Salim Fruit) आरोपपत्र दाखल करण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) आणखी 90 दिवसांची मुदत मागितली आहे. तपास यंत्रणेने यासंदर्भात सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. त्यावर न्यायालयाने बुधवारी दोन्ही बाजूकडील युक्तिवाद ऐकल्यानंतर निकाल राखीव ठेवला आहे.
Salim Fruit: सलीम फ्रुट विरोधात आरोपपत्र दाखल करण्याकरीता वाढीव मुदत द्या - एनआयए - सलीम फ्रुट
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमच्या (Dawood Ibrahim) नावाने खंडणी उकळल्याच्या आरोपावरून अटक केलेल्या सलीम फ्रुटविरोधात (Salim Fruit) आरोपपत्र दाखल करण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) आणखी 90 दिवसांची मुदत मागितली आहे.
दोन्ही पक्षांकडून युक्तिवाद: सलीम फ्रुटने दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील यांच्या नावाने व्यावसायिक, बिल्डरसह अनेक लोकांना धमकावले आणि त्यांच्याकडून खंडणी उकळली आहे. तसेच त्याने मोठ्या प्रमाणावर भूखंड देखील हडप केले आहेत, असा आरोप एनआयएने केला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास केला जात असून एनआयए द्वारे आरोपीविरोधात सबळ पुरावे जमा करने जारी आहे. बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्यांतर्गत आरोपपत्र दाखल करण्यासाठी आणखी 90 दिवसांची मुदत द्या, अशी विनंती एनआयएच्या वतीने ऍड. संदीप सदावर्ते यांनी बुधवारी सत्र न्यायाधीश बी. डी. शेळके यांना केली. त्यावर सलीम फ्रूटचे वकील विकार राजगुरू यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. एनआयएकडील पुरावे बनावट असून ही तपास यंत्रणा निष्कारण तपासाला विलंब करून त्रास देतेय, असा युक्तिवाद त्यांनी केला आहे. दोन्ही युक्तिवादाची दखल न्यायाधीशांनी घेतली आणि एनआयएच्या अर्जावर 21 ऑक्टोबरला निर्णय देणार असल्याचे जाहीर केले.
डी कंपनी विरोधात अनेक पुरावे: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याची डी कंपनी आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना म्हणून ओळखली जाते. मुंबईमध्ये दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर, टायगर मेमन, इब्राहिम कासकर तसेच सलीम फ्रुट हे त्याचे हस्तक डी कंपनीचा कारभार पाहतात. या विरोधात अनेक पुरावे तपास यंत्रणेला प्राप्त झालेले आहे. या संदर्भात तेरा ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती व या छापेमारीमध्ये अनेक इलेक्ट्रॉनिक पुरावे व कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. अनधिकृत बांधकाम आणि प्रसिद्ध व्यावसायिकांकडून डी कंपनीच्या नावाने खंडणी मागून डी कंपनीला हवालामार्फत पोहोचवण्याचे काम करण्यात येत होते, असा आरोप देखील आज युक्तिवादा दरम्यान लावण्यात आला आहे.