मुंबई - राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) नौदलाच्या हेरगिरीप्रकरणी एकाला अटक केली आहे. जितेली इमरान (वय 37) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव असून तो गुजरातमधील गोध्राचा रहिवासी आहे. जितेली हा पाकिस्तानच्या आयएसआयसाठी हेरगिरी करत असल्याचे समोर आले आहे.
नौदलाच्या हेरगिरी प्रकरणी एकाला अटक; एनआयएची कारवाई - भारतीय नौदल हेरगिरी न्यूज
पाकिस्तानातून हेरगिरी करणारी आयएसआय ही संस्था भारतीय नौदलाची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. माहिती मिळवण्यासाठी नौदलातील कर्मचाऱ्यांचा वापर होत आहे. भारतीय नौदलाची हेरगिरी केल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने एका व्यक्तीला अटक केली आहे.
![नौदलाच्या हेरगिरी प्रकरणी एकाला अटक; एनआयएची कारवाई Espionage](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-8805582-237-8805582-1600149889135.jpg)
पाकिस्तान काही हेरांच्या मदतीने भारतीय नौदलाची संवेदनशील ठिकाणे, पाणबुडी व इतर लष्करी आस्थापनांची हेरगिरी करून गोपनीय माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. विशाखापट्टणमचीगोपनीय माहिती पाकिस्तानला देण्याचे जितेली करत होता. नौदलातील काही जण फेसबुक, व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पाकिस्तानी एजंटच्या संपर्कात आले होते. या नौदल कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये मुंबईतील एका एजंटच्या मदतीने पैसे जमा करण्यात आले होते. या प्रकरणी 14 जणांच्या विरोधात एनआयएकडून आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
अटक केलेला एजंट जितेली इमरान हा पाकिस्तानी एजंटच्या संपर्कात होता व तो भारत-पाकिस्तान दरम्यान होणाऱ्या कापड व्यापाराच्या माध्यमातून पाकिस्तानात जात-येत असे. भारतीय नौदलाच्या मुंबई येथील जवानांकडून अधून-मधून मिळणाऱ्या माहितीसाठी आरोपी हा वेळोवेळी त्यांच्या बँक खात्यांमध्ये पैसे भरत होता. जितेली इमरान याच्या झडतीत एनआयएला काही महत्त्वाची कागदपत्रे व डिजिटल उपकरणे मिळाली आहेत.