महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Gautam Navlakha : नवलखावर अमेरिकास्थित आयएसआय एजंटशी संबंध असल्याचा NIA चा आरोप - एल्गार परिषद प्रकरणात माओवाद्यांशी संबंध

NIA ने गौतम नवलखा यांच्यावर अमेरिकेत असलेल्या ISI एजंटशी संबंध असल्याचा आरोप केला. तसेच नवलखा यांच्या जामीन अर्जाला विरोध केला आहे. एल्गार परिषद प्रकरणात गौतम नवलखा याचे अमेरिकेत अटक करण्यात आलेल्या पाकिस्तानी आयएसआय एजंटशी संबंध असल्याचे राष्ट्रीय तपास संस्थेने एनआयएने मुंबई उच्च न्यायालयाला सांगितले आहे.

Gautam Navlakha
Gautam Navlakha

By

Published : Feb 21, 2023, 8:05 PM IST

मुंबई :एल्गार परिषद प्रकरणी माओवाद्यांशी संबंध प्रकरणात अटक करण्यात आलेले कार्यकर्ते गौतम नवलखा याचे अमेरिकेत अटक करण्यात आलेल्या पाकिस्तानी आयएसआय एजंटशी संबंध होते, असे राष्ट्रीय तपास संस्थेने एनआयएने मुंबई उच्च न्यायालयात सांगितले आहे. तसेच गौतम नवलखा यांच्या जामिनाला एनआयएने विरोध केला आहे. नवलखाच्या याचिकेला उत्तर म्हणून दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात, त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा, एकता आणि सार्वभौमत्वावर थेट परिणाम करणारे कृत्य केल्याचा दावा केला आहे.




नवलखाच्या जामीन अर्जाला विरोध :नवलखाच्या याचिकेला उत्तर म्हणून दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात, त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा, एकता आणि सार्वभौमत्वावर थेट परिणाम करणारे कृत्य केल्याचा दावा एनआयएने केला आहे. एनआयएचे वकील संदेश पाटील यांनी सोमवारी न्यायमूर्ती ए. एस. गडकरी, न्यायमूर्ती पी. डी. नाईक यांच्या खंडपीठासमोर नवलखा यांच्या जामीन अर्जाला विरोध करत उत्तर दाखल केल्याची माहिती दिली. या अर्जावर २७ फेब्रुवारी रोजी युक्तिवाद सुनावणार असल्याचे खंडपीठाने सांगितले.

नवलखा गुलाम गुलाम नबी फई यांच्या संपर्कात : एनआयएने आपल्या प्रतिज्ञापत्रात दावा केला आहे की, नवलखा हे गुलाम नबी फई यांनी आयोजित केलेल्या काश्मिरी अमेरिकन कौन्सिल कॉन्फरन्समध्ये बोलण्यासाठी तीनदा अमेरिकेला गेले होते. ज्यांच्याशी नवलखा नियमितपणे संपर्कात असल्याचा आरोप एनआयएने केला आहे. गुलाम नबी फई यांना अमेरिकन एजन्सी एफबीआयने जुलै 2011 मध्ये ISI आणि पाकिस्तान सरकारकडून निधी स्वीकारल्याबद्दल अटक केली होती. नवलखा यांनी गुलाम गुलाम नबी फई यांच्या खटला चालवणाऱ्या अमेरिकन न्यायालयाच्या न्यायाधीशांना पत्र लिहिले होते, असे न्यायालयात उत्तर देतांना सांगितले. आयएसआयच्या सांगण्यावरून गुलाम नबी फई यांनी गौतम नवलखा यांची ओळख पाकिस्तानी आयएसआय जनरलशी करुन दिल्याचा दावा एनआयएने केला आहे.

नवलखा यांचे माओवादी संघटनेशी संबंध : प्रकृतीच्या कारणास्तव सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्यामुळे नवलखा सध्या नजरकैदेत आहेत. एआयएने असेही म्हटले आहे की नवलखाचे सीपीआय या माओवादी संघटनेशी घट्ट संबंध आहेत. नवलखा त्यांच्या व्याखानातून तसेच सरकारविरोधी माओवाद्यांच्या भुमिकेचे समर्थन करतात.

नवलखा यांच्याकडे मोठी जबाबदारी : नवलखा यांच्या कारवायांचा उद्देश सरकारला उलथवून टाकणे होता, असे एनआयएने दिलेल्या उत्तरात म्हटले आहे. नवलखा यांना सैन्याविरुद्ध बुद्धिजीवींना एकत्र करणे, सीपीआय माओवादी संघटनेच्या गनिमी कारवायांसाठी केडरची भरती करणे यासारखी कामे सोपवण्यात आली होती, असा आरोप एनआयएने न्यायालयात केला आहे. नवलखा यांची नलक्षलवाद्यांच्या विचार सरणीला पुढे नेण्यात महत्वाची भूमिका होती असे एनआयएचे म्हणणे आहे.

कोरेगाव-भीमा हिंसाचार :31 डिसेंबर 2017 एल्गार परिषदेची पुण्यात बैठक झाली होती. या बैठकीत झालेल्या एल्गार परिषदेच्या प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप नवलखासह अन्य आरोपींवर आहे. या प्रक्षोभक भाषणामुळे दुसऱ्या दिवशी पुणे जिल्ह्यातील कोरेगाव-भीमा युद्ध स्मारकाजवळ हिंसाचार घडवून मोठा हिंसाचार घडून आला होता. या एल्गार परिषदेत माओवादी विचारांचे समर्थन केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या प्रकरणात अनेक उच्च शिक्षित, शिक्षणतंज्ञांचा समावेश आहे. या सर्व प्रकरणाचा तपास सध्या एनआयएकडे वर्ग करण्यात आला आहे.

हेही वाचा -Narhari Zirwal : मी जी कारवाई केली ती कायद्यानुसारच केली -नरहरी झिरवाळ

ABOUT THE AUTHOR

...view details