मुंबई:राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तथा माजी मंत्री नवाब मलिक यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांनी जामीनासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाने मलिक यांची याचिकेवर सुनावणी पार पडली. दरम्यान, उच्च न्यायालय पुढील सुनावणी 6 मार्च रोजी घेणार आहे.अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित असलेली कुर्ला येथील भूखंड बाजारदरापेक्षा अत्यल्प किमतीत घेतल्याचा आरोप नवाब मलिक यांच्यावर आहे. या प्रकरणी मलिक यांनी गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात अटक करण्यात आली होती.
मलिकांच्या वकिलांचा दावा: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक हे खरोखर गंभीर आजाराने त्रस्त आहेत. वैयक्तिक स्वातंत्र्य तसेच आरोग्याचा अधिकार राज्यघटना मूलभूत अधिकार 21 अंतर्गत विचार पाहता, बेल हा नियम जेल हा अपवाद ह्याचा विचार न्यायालयाने करावा. तसेच कुर्ला येथील मॉलचा नवाब मलिक यांचा काहीही संबंध नसल्याचा दावा अॅड. अमित देसाई यांनी केला. तसेच आजची सुनावणी न्यायालयाने तहकूब करत सोमवारी (6 मार्च) पुढील सूनावणी निश्चित केली आहे. न्यायमूर्ती कर्णिक खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली.
सुनावणी दरम्यान उपस्थित केला प्रश्न: अॅड. अमित देसाई यांनी पुढे मुद्दे उपस्थित केले की, मुनिरा ज्यांच्याकडून नवाब मलिक यांनी मालमत्ता खरेदी केली ती कायदेशीर प्रक्रिया करून खरेदी केली आहे. त्याचे सर्व रेकॉर्ड शासनाच्या दप्तरी आहे. त्याचा विचार न्यायालयाने करायला हवा. मुनिरा यांनी पूर्वी म्हणजे 2021 आधी कोणताही एफआयआर दाखल केला नाही, याचे कारण काय असा प्रश्न आहे. तसेच कुर्ला येथील मॉलचा काहीही संबंध नवाब मालिक यांच्याशी नाही, असा दावा देखील आज अॅड. अमित देसाई यांनी केला.