महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

देशात पुढचे सरकार काँग्रेसचेच असेल - मिलिंद देवरा

पुढील सरकार काँग्रेसचचेच असेल असा विश्वास मिलिंद देवरा यांनी व्यक्त केला आहे.

पुढील सरकार काँग्रेसचाच असल्याचा मिलिंद देवरा यांचा विश्वास

By

Published : Mar 26, 2019, 10:56 PM IST

मुंबई- मुंबई पोर्ट ट्रस्टच्या १ हजार ८०० एकर जागेच्या विकासासाठी मोदी सरकारची नियत खोटी दिसते. त्यामुळेच या जागेच्या सर्व्हेसाठी स्थानिकांना विश्वासात घेतले नाही. पण मी तुम्हाला विश्वास देतो, की देशात पुढील सरकार हे काँग्रेसचेच असेल, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मिलिंद देवरा यांनी म्हटले आहे.

पुढील सरकार काँग्रेसचाच असल्याचा मिलिंद देवरा यांचा विश्वास

केंद्र सरकारकडून मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेवर विकास योजना राबविण्यासाठी, येथील स्थानिकांना इतरत्र हलविण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच काहींना आगाऊ कर भरण्यासाठी तगादा लावला जात आहे. त्यामुळे आज बीपीटी बचाव या मोहिमेच्या विविध संस्था, रहिवाशी यांनी देवरा यांची भेट घेऊन आमचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी केली. त्यावर देवरा यांनी पुढील सरकार आपलेच येणार आहे. त्यामुळे तुमच्या प्रश्नावर सर्वाप्रथम मी मार्ग काढण्यासाठी पुढे येईन, असे म्हटले आहे.

देवरा म्हणाले, देशातील पोर्ट ट्रस्टच्या बाजूला असलेल्या जागेच्या विकासासाठी आमच्या काळात धोरण आणले होते. त्याला मी विरोध केला. मुंबई, कोलकाता आणि कांडला या पोर्टच्या जागेला धोरणातून वगळण्यासाठी आम्ही पाठपुरावा केला होता आणि त्याला यशही आले होते, अशी माहीती देवरा यांनी दिली.

मी १५ वर्षांपासून पोर्ट ट्रस्टच्या प्रश्नावर काम करतोय. केंद्र सरकारकडून अन्याय होत आहे. त्यामागे त्यांची नियत चांगली नाही. कोस्टल रोडच्या विकासाच्या बाजूने मीही आहे. मात्र, मुंबई पोर्ट ट्रस्टच्या १ हजार ८०० एकर जागेवर जो विकासाचा विषय आणला आहे, त्यामागे सरकारची नियत चांगली नाही. त्यामुळे २९ एप्रिल हा दिवस खूप महत्वाचा आहे. त्या दिवशी निर्णय घ्या. आता त्यासाठी ३० दिवस आहेत. त्यात विचार करा. तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी विचार करा आणि सर्वांनी मिलिंद देवरा बनून पुढे या, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

ABOUT THE AUTHOR

...view details