मुंबई - बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा तीव्र पट्टा निर्माण झाल्याने सध्या उन्हाचा तडाखा काहीसा कमी झाला आहे. यामुळे दक्षिणेतील राज्यांसह महाराष्ट्राला पुढील चार दिवस अवकाळी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाकडून ( Meteorological Department ) वर्तवण्यात आली आहे.
थेट परिणाम नाही पण... -हवामान विभागाचे अधिकारी के. एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या वादळाचा महाराष्ट्राला थेट फटका बसणार नाही. तरी या हवामानातील बदलामुळे मुंबईसह राज्यातील काही भागात पावसाची शक्यता असून वातावरण ढगाळ राहील. 23, 24 व 25 मार्चदरम्यान मुंबई, कोकणसह दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे.