मुंबई : विधान परिषद निवडणूकीत शिक्षक पदवीधर मतदारसंघात विजय मिळवलेल्या सदस्यांना विधान परिषद उपसभापती यांच्याकडून आज शपथ देण्यात आली. यावेळी विधान भवन, मुंबई येथे झालेल्या या शपथविधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्र विधानसभेचे विरोधीपक्ष नेते अजित पवार तसेच विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत शपथविधी पार पडला.
नवनिर्वाचित सदस्यांनी घेतली शपथ : विधानपरिषदेवर पदवीधर मतदारसंघातील नवनिर्वाचित सदस्यांपैकी सत्यजीत सुधीर तांबे (नाशिक विभाग पदवीधर ) व धीरज रामभाऊ लिंगाडे (अमरावती विभाग पदवीधर) तसेच विधानपरिषदेवर शिक्षक मतदारसंघातील नवनिर्वाचित सदस्य विक्रम वसंतराव काळे (औरंगाबाद विभाग शिक्षक), सुधाकर गोविंदराव अडबाले (नागपूर विभाग शिक्षक) व ज्ञानेश्वर बारकू म्हात्रे (कोकण विभाग शिक्षक ) अशा एकूण पाच सदस्यांनी आज 08 फेब्रुवारी रोजी मध्यवर्ती सभागृह, विधान भवन, मुंबई येथे विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांचेकडून विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेतली.
ठाकरे गटाला निवडणुकीत फटका : महाविकास आघाडी यांच्यावतीने कोकण विभागातील शिक्षक मतदार संघासाठी बळीराम पाटील यांची उमेदवारी दिली गेली होती. मात्र ज्ञानेश्वर बारकू म्हात्रे जे उद्धव ठाकरे गट सोडून शिंदे गटात सामील झाले. त्यांनी भारतीय जनता पक्षाच्यावतीने विधान परिषदेची शिक्षक मतदार संघाची निवडणूक लढवली. ते चांगल्या मताधिक्यांनी निवडून आले. त्यामुळे नागपूर या ठिकाणची जागा भारतीय जनता पक्षाला मिळाली नाही. यासोबत कोकणामध्ये मात्र भारतीय जनता पक्षाने शिंदे गटाच्या मदतीने विजयी मिळवण्यास मदत झाली. यामुळे विधानपरिषद निवडणूकीत ठाकरे गटाला फटका बसला आहे.