मुंबई -प्रिन्सच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याची प्रतिक्रिया पालिकेच्या नवनिर्वाचीत महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. केईएम रुग्णालयाच्या निष्काळजीमुळे दोन महिन्यांच्या प्रिन्सचा हात कापावा लागला होता. त्यानंतर शुक्रवारी प्रिन्सचा मृत्यू झाला. प्रिन्स उपचारांना साथ देत नसल्याची माहिती केईएम रुग्णालय प्रशासनाने कालच (गुरुवारी) दिली होती.
हेही वाचा - वरणगाव शस्त्रात्र निर्मिती कारखान्यात स्फोट; तीन कर्मचारी गंभीर जखमी
मुंबईच्या महापौर पदावर किशोरी पेडणेकर आणि उपमहापौर पदावर सुहास वाडकर यांची बिनविरोध निवड झाली. त्यानंतर पेडणेकर पत्रकारांशी बोलत होत्या.
पेडणेकर म्हणाल्या, तुमच्याकडून आताच मला प्रिन्स बाबत माहिती मिळाली आहे. मी सुद्धा एक आई आहे. आईचे दुःख काय असते हे मी समजू शकते. त्यामुळे प्रिन्स प्रकरणी जे कोणी अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे पेडणेकर यांनी सांगितले. मुंबई महापालिकेत गेल्या कित्तेक वर्षात महापौरांची आणि उपमहापौरांची बिनविरोध निवड झाली नव्हती. यावेळी बिनविरोध निवड होत असल्याने अत्यानंद होत आहे. पालिकेत वेगळा इतिहास निर्माण झाला आहे त्याचा आनंद असल्याचे सांगितले.
हेही वाचा -देश आर्थिक संकटात तरीही सरकार मात्र 'हाताची घडी आणि तोंडावर बोट', सामनातून सरकारला खडेबोल