महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mumbai Police Action : थर्टी फर्स्टच्या रात्री वाहतूक नियमांची पायमल्ली, 1817 जणांवर गुन्हा दाखल

मुंबईत कोरोनाच्या अनुषंगाने निर्बंध लागू ( Mumbai Corona Restriction ) करण्यात आले होते. मात्र, तळीरामांकडून निर्बंधांची पायमल्ली केली गेली. याप्रकरणी 1817 जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Mumbai Police Action drink and cases
Mumbai Police Action drink and cases

By

Published : Jan 1, 2022, 7:01 PM IST

मुंबई :मुंबईत मागील काही दिवसांपासून कोरोना आणि ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येत मोठ्या ( Corona And Omicron Cases Increased In Mumbai ) प्रमाणात वाढ झाली. त्या पार्श्वभूमीवर निर्बंध पाळून नववर्षाचे स्वागत करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले होते. मात्र, शहरात तळीरामांकडून वाहन चालवत वाहतूक नियमांची पायमल्ली करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी 1,817 लोकांवर गुन्हे दाखल केले असून, 18 तळीरामांवर ( Police Register 18 Drink And Drive Cases ) कारवाई केली आहे. तर दिंडोशी पश्चिम उपनगरांमध्ये एकही ड्रिंक अँड ड्राईव्ह केसची नोंद झाली नाही.

मुंबईत अचानक रुग्णसंख्या दुपटीने वाढली. त्यामुळे नववर्षाच्या जल्लोषासाठी होणारी गर्दी लक्षात घेता नाईट कर्फ्यू तसेच लोकांनी रस्त्यावर गर्दी करू नये म्हणून कलम 144 लागू केले गेले. नागरिकांनी घरातच नवीन वर्षाचे स्वागत करावे बाहेर पडू नये, असे आवाहन महापालिकेने केले होते.

हेल्मेटशिवाय दुचाकी चालवणाऱ्या....

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 डिसेंबरला रात्री प्रत्येक नागरिकाला नाकाबंदीतून जावे लागले. यावेळी तपासादरम्यान पोलिसांनी 18 जणांविरुद्ध दारु पिऊन वाहन चालवल्याप्रकरणी रॅश ड्रायव्हिंगचा गुन्हा दाखल केला. तसेच, हेल्मेटशिवाय दुचाकी चालवणाऱ्या 408 जणांवर, ट्रिपल सीट बाईक चालवल्याप्रकरणी 16 जणांवर, मोटार वाहन कायद्याप्रमाणे वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 1 हजार 375 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. 31 डिसेंबर 2021 रोजी रात्री 8 वाजेपासून ते 1 जानेवारी 2022 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत ही कारवाई करण्यात आली.

2020 साली 798 तळीरामांवर कारवाई

वाहतूक पोलिसांनी 31 डिसेंबरला केवळ 18 तळीरामांवर कारवाई केली. 2020 पेक्षा यंदा हा आकडा कमी होता. 2020 साली 798, 2019 साली 433 तळीरामांवर कारवाई करण्यात आली. या वर्षी तळीरामांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते आहे.

हेही वाचा -Mumbai High Court : मुंबई उच्च न्यायालयाचे कामकाज सोमवारपासून प्रत्यक्ष आणि ऑनलाईन पद्धतीने

ABOUT THE AUTHOR

...view details