महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

New Wards Will be Formed : स्थानिक स्वराज्य संस्थांसाठीच्या प्रभाग रचना रद्द, नव्याने होणार प्रभाग रचना - स्थानिक स्वराज्य संस्था

मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना नव्याने बनवण्यात आली होती. याला निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला आहे. त्यानंतर प्रभाग रचना रद्द करण्यात आली आहे. प्रभाग रचना रद्द केल्याचे राज्य सरकारने राजपत्रात प्रसिद्ध केले आहे.

मंत्रीमंडळ
मंत्रीमंडळ

By

Published : Mar 14, 2022, 10:07 PM IST

मुंबई- मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना नव्याने बनवण्यात आली होती. याला निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला आहे. त्यानंतर प्रभाग रचना रद्द करण्यात आली आहे. प्रभाग रचना रद्द केल्याचे राज्य सरकारने राजपत्रात प्रसिद्ध केले आहे. नव्याने करण्यात आलेल्या अधिनियमाद्वारे निवडणूक आयोगाच्या मदतीने राज्य सरकार आता पुन्हा नव्याने प्रभाग रचना करणार आहे.

अशी होणार प्रभाग रचना -राज्य निवडणूक आयुक्त, ज्यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग आणि महिला यांच्यासाठी जागा राखून ठेवलेल्या आहेत, असे प्रभाग राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या आदेशाद्वारे विनिर्दिष्ट करील. राज्य निवडणूक आयुक्त, नंतरच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी असा कोणताही आदेश संमत करताना सर्व प्रभागांना अशा आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी नगरपालिका क्षेत्रातील निरनिराळ्या प्रभागांमध्ये अशा जागा, आळीपाळीने राखून ठेवलेल्या आहेत, अशी खात्री करेल. पण, असा कोणताही आदेश प्रसिद्ध करण्यापूर्वी राज्य निवडणूक आयुक्त व त्यांनी योजलेल्या आदेशाचा मसुदा नगरपालिका क्षेत्रातील क्षेत्रातील सर्व रहिवाशांच्या माहितीसाठी नगरपालिका कार्यातलयातील सूचना फलकावर आणि त्यांना योग्य वाटेल, अशा ठिकाणी लावण्याची सूचना करण्यात आली. तसेच याबाबत स्थानिक वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्याची व्यवस्था स्थानिक प्रशासनाने करावी. त्याबाबत ज्यांना आक्षेप आहेत, अशा सर्व व्यक्तींना नोटीस वृत्तपत्रात प्रसिद्ध केल्याच्या दिनांकापासून सात दिवसांच्या आत त्यांच्या कारणांसह आक्षेप लेखी सादर करावे लागणार आहेत.

हेही वाचा -​​Shambhuraj Desai : 'पोलिस दलाच्या बळकटीकरणावर भर' - गृहमंत्री शंभूराजे देसाई

ABOUT THE AUTHOR

...view details