मुंबई - शहरामध्ये ७० किलो मीटर प्रती तास वेगाने गाडी चालवल्यास तुम्हाला आता वाहतूक पोलिसांच्या ईचलनामार्फत दंड भरावा लागू शकणार आहे. वाहनचालकांसाठी वाहनांची वेग मर्यादा आता प्रती तास ७० किमी करण्यात आली आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी काल जारी केलेल्या आदेशानुसार हे निर्बंध घालण्यात आले आहेत. यामुळे जर आता तुम्ही मुंबईत गाडी चालवणार असाल तर सावधान! आपल्या वेगाला मर्यादा घाला नाही तर वाहतूक पोलीस तुम्हाला दंडाच्या ठोठावणार आहेत. आणि तुम्हाला वाटत असेल की, आपल्याला कोण पाहत आहे? तर हा समज चुकीचा आहे. कारण सीसीटीव्ही कॅमेऱ्या तुमच्यावर नजर ठेवून आहेत.
सावधान..! 70 किमी प्रति तास वेगाने वाहन चालावताय, मुंबई वाहतूक पोलीसांचा नवा आदेश हेही वाचा -अर्थव्यवस्थेकडे दुर्लक्ष करून सरकारचे सामाजिक आणि राजकीय मोहिमेकडे लक्ष केंद्रित'
संपूर्ण मुंबईत प्रती तास ७० किमी वेग मर्यादा करण्यात आली असून, यातही काही ठिकाणी विशेष वेगमर्यादा ठरविण्यात आली आहे.
- मरीन ड्राईव्ह प्रती तास ६५ किमी वेग मर्यादा
- वरळी सी लिंक प्रती तास ८० किमी वेग मर्यादा
- वरळी सी लिंक वळणावर प्रती तास ३५ ते ४० किमी वेग मर्यादा
- पुर्व, पश्चिम, सायन पनवेल, एससीएलआर या चारही मार्गावर प्रती तास ७० किमी
- जे. जे. उड्डाण पुल प्रती तास ६० किमी वेग मर्यादा तर वळणावर प्रती तास ४० किमी वेग मर्यादा
- इस्टर्न फ्री वे वर प्रती तास ८० किमी वेग मर्यादा तर वळणावर ४० किमी प्रती तास वेग मर्यादा
- लालबाग उड्डाण पूल, जग्गनाथ शंकर शेठ उड्डाणपूल, नाना लाल मेहता उड्डाण पुल या तीनही उड्डाण पुलांवर वेग मर्यादा प्रती तास ७० किमी असेल.
हेही वाचा -"नगरसेवकपद रद्द केल्याचा आदेश मिळाला, अपिलात जाण्याबद्दल अद्याप निर्णय नाही"