महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईत आज कोरोनाचे 1,263 नवे रुग्ण, 44 मृत्यू ; कोरोनाग्रस्तांचा आकडा 92,720 वर - कोरोना रुग्णसंख्या मुंबई

कोरोना विषाणूमुळे आज मुंबईत 44 जणांचा मृत्यू झाला असून 1 हजार 441 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, 1 हजार 263 रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईत कोरोनाचे 92 हजार 720 रुग्ण आहेत. त्यापैकी 5 हजार 285 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईत सध्या कोरोनाचे 22 हजार 556 सक्रिय रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

मुंबईत आज कोरोनाचे 1263 नवे रुग्ण, 44 रुग्णांचा मृत्यू
मुंबईत आज कोरोनाचे 1263 नवे रुग्ण, 44 रुग्णांचा मृत्यू

By

Published : Jul 12, 2020, 9:16 PM IST

Updated : Jul 12, 2020, 10:11 PM IST

मुंबई : कोरोना विषाणूचे मुंबईत आज (रविवार) नवे 1 हजार 263 रुग्ण आढळून आले असून 44 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 92 हजार 720 वर पोहोचला आहे. तर, मृतांचा आकडा 5 हजार 285 वर पोहोचला आहे. मुंबईमधून आज 1 हजार 441 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांचा आकडा 64 हजार 872 वर पोहोचला आहे. मुंबईत सध्या 22 हजार 556 सक्रिय रुग्ण असून मुंबईमधील रुग्ण बरे होण्याचा दर 70 टक्क्यांवर पोहोचला असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूमुळे मुंबईत आज 44 जणांचा मृत्यू झाला आहे. यांपैकी 32 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 29 पुरुष आणि 15 महिला रुग्णांचा समावेश होता. मृतांमध्ये 4 जणांचे वय 40 वर्षाखाली होते, 32 जणांचे वय 60 वर्षावर तर 8 जणांचे वय 40 ते 60 वर्षादरम्यान होते. मुंबईमधून आज 1 हजार 441 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांचा आकडा 64 हजार 872 वर पोहोचला आहे. मुंबईत कोरोनाचे 92 हजार 720 रुग्ण आहेत. त्यापैकी 5 हजार 285 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईत सध्या कोरोनाचे 22 हजार 556 सक्रिय रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

रुग्ण बरे होण्याचा दर 70 टक्क्यांवर -

मुंबईतील कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचा दर 70 टक्क्यांवर पोहचला आहे. 5 ते 11 जुलैपर्यंत रुग्ण वाढीचा दर 1.39 टक्के इतका आहे. मुंबईमधील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 50 दिवस इतका आहे. मुंबईत सध्या ज्या विभागात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत, अशा 732 चाळी आणि झोपडपट्टी असलेल्या विभागात कंटेन्मेंट झोन म्हणून सील करण्यात आले आहेत. तर, कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 6 हजार 751 इमारतीमधील काही माळे, काही विंग तर काही इमारती पूर्ण सील करण्यात आल्या आहेत. मुंबईमध्ये आतापर्यंत कोरोनाचे निदान करण्यासाठी 3 लाख 91 हजार 222 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.

Last Updated : Jul 12, 2020, 10:11 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details