महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईत कोरोनाचे 1381 नवे रुग्ण, 62 मृत्यू; रुग्ण बरे होण्याचा दर 68 टक्क्यांवर

कोरोना विषाणूचे मुंबईत आज नव्याने 1 हजार 381 रुग्ण आढळून आले आहेत, तर 62 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे, मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 87 हजार 513 वर पोहोचला आहे. त्यापैकी 5 हजार 61 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, आतापर्यंत 59 हजार 238 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळे मुंबईत सध्या कोरोनाचे 23 हजार 214 सक्रिय रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

मुंबईत कोरोनाचे 1381 नवे रुग्ण, 62 मृत्यू
मुंबईत कोरोनाचे 1381 नवे रुग्ण, 62 मृत्यू

By

Published : Jul 8, 2020, 10:53 PM IST

मुंबई : कोरोना विषाणूचे मुंबईत आज(बुधवार) नवे 1 हजार 381 रुग्ण आढळून आले असून 62 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 87 हजार 513 वर पोहोचला आहे. तर, मृतांचा आकडा 5 हजाराच्या पार गेला असून 5 हजार 61 मृत्यू झाले आहेत. मुंबईमधून आज 1 हजार 101 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांचा आकडा 59 हजार 238 वर पोहचला आहे. मुंबईत सध्या 23 हजार 214 सक्रिय रुग्ण असून रुग्ण बरे होण्याचा दर 68 टक्क्यांवर पोहचला असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचे मुंबईत आज नव्याने 1 हजार 381 रुग्ण आढळून आले आहेत, तर 62 जणांचा मृत्यू झाला आहे. 62 मृत्यूपैकी 59 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 49 पुरुष आणि 13 महिला रुग्ण होत्या. मृतांमध्ये 5 जणांचे वय 40 वर्षाखाली होते, 41 जणांचे वय 60 वर्षावर तर 16 जणांचे वय 40 ते 60 वर्षादरम्यान होते. मुंबईमधून आज 1 हजार 101 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांचा आकडा 59 हजार 238 वर पोहोचला आहे. मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 87 हजार 513 वर पोहोचला आहे. त्यापैकी 5 हजार 61 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, आतापर्यंत 59 हजार 238 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळे मुंबईत सध्या कोरोनाचे 23 हजार 214 सक्रिय रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

रुग्ण बरे होण्याचा दर 68 टक्क्यांवर -

मुंबईतील कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचा दर 68 टक्क्यांवर पोहचला आहे. 1 ते 6 जुलैपर्यंत रुग्ण वाढीचा दर 1.54 टक्के इतका आहे. मुंबईमधील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 45 दिवस इतका आहे. मुंबईत सध्या ज्या विभागात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत अशा 757 चाळी आणि झोपडपट्टी असलेले विभागात कंटेन्मेंट झोन म्हणून सील करण्यात आले आहेत. तर, कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 6 हजार 352 इमारतींमधील काही माळे, काही विंग तर काही इमारती पूर्ण सील करण्यात आल्या आहेत. मुंबईमध्ये आतापर्यंत कोरोनाचे निदान करण्यासाठी 3 लाख 68 हजार 603 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details