मुंबई - कोरोनाचे मुंबईत आज(सोमवार) 1 हजार 43 नवे रुग्ण आढळून आले असून 41 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1,02,267 वर पोहोचला आहे. तर, मृतांचा आकडा 5752 वर पोहोचला आहे. मुंबईमध्ये आतापर्यंत एकूण 72,650 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने सध्या 23,865 सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईमधील रुग्ण बरे होण्याचा दर 71 टक्क्यांवर पोहोचला असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 57 दिवसांवर पोहोचला आहे.
मुंबईत कोरोनाचे 1043 नवे रुग्ण, 41 मृत्यू; कोरोनाग्रस्तांचा आकडा 1,02,267 वर - mumbai corona cases today news
मुंबईत आज कोरोनाच्या आणखी 1043 रुग्णांची भर पडली, तर 41 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे, मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या 1,02,267 वर पोहचली असून मृतांची संख्या 5752 इतकी झाली आहे. तर, मुंबईतून आज 965 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामुळे डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांचा आकडा 72650 वर पोहोचला आहे.
जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूमुळे मुंबईत आज 41 जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी 36 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. या मृतांमध्ये 27 पुरुष तर 14 महिला रुग्णांचा समावेश आहे. मुंबईतून आज 965 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामुळे डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांचा आकडा 72650 वर पोहोचला आहे. मुंबईत कोरोनाचे 102267 रुग्ण असून 72650 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 5752 रुग्णांचा मृत्यू झाल्याने सध्या 23865 सक्रिय रुग्ण आहेत.
मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 71 टक्क्यांवर पोहचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 57 दिवस तर सरासरी दर 1.21 टक्के आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 667 चाळी आणि झोपडपट्टी कंटेन्मेंट झोन घोषित करुन सील करण्यात आल्या आहेत. तसेच 6173 इमारती व इमारतीच्या विंग, काही मजले सील करण्यात आले आहेत. कोरोनाचे निदान करण्यासाठी 4 लाख 38 हजार 261 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.