महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईत कोरोनाचे 1310 नवे रुग्ण, 58 मृत्यू, कोरोनाग्रस्तांचा आकडा 1,04,572 वर - कोरोना मृत्यूसंख्या मुंबई बातमी

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूमुळे मुंबईत आज 58 जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी 48 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 37 पुरुष तर 21 महिला रुग्ण आहेत. मुंबईतून आज 1563 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामुळे डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांचा आकडा 75 हजार 118 वर पोहोचला आहे.

मुंबईत कोरोनाचे 1310 नवे रुग्ण
मुंबईत कोरोनाचे 1310 नवे रुग्ण

By

Published : Jul 22, 2020, 8:58 PM IST

मुंबई : कोरोनाचे मुंबईत आज(बुधवार) 1 हजार 310 नवे रुग्ण आढळून आले असून 58 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 04 हजार 572 वर पोहोचला आहे. तर, मृतांचा आकडा 5 हजार 872 वर पोहोचला आहे. मुंबईमधून आज एकाच दिवशी 1563 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत आतापर्यंत एकूण 75 हजार 118 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने सध्या 23 हजार 582 सक्रीय रुग्ण आहेत. मुंबईमधील रुग्ण बरे होण्याचा दर 71 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर, रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 59 दिवसांवर पोहोचला आहे.

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूमुळे मुंबईत आज 58 जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी 48 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 37 पुरुष तर 21 महिला रुग्णांचा समावेश आहे. मुंबईतून आज 1563 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामुळे डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांचा आकडा 75 हजार 118 वर पोहोचला आहे. मुंबईत कोरोनाचे 1 लाख 04 हजार 572 रुग्ण असून 75 हजार 118 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 5 हजार 872 रुग्णांचा मृत्यू झाल्याने सध्या 23 हजार 582 सक्रीय रुग्ण आहेत.

मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 71 टक्क्यांवर पोहचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 59 दिवस तर सरासरी दर 1.18 टक्के आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 639 चाळी आणि झोपडपट्टी कंटेन्मेंट झोन घोषित करून सील करण्यात आल्या आहेत. तसेच 6 हजार 100 इमारती व इमारतीच्या विंग, काही मजले सील करण्यात आल्या आहेत. कोरोनाचे निदान करण्यासाठी 4 लाख 50 हजार 459 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details