मुंबई - मुंबईत कोरोनाचे नवे 1 हजार 359 रुग्ण आढळून आले असून 77 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 61 हजार 501 वर पोहचला आहे, तर मृतांचा आकडा 3 हजार 242 वर पोहचला आहे. मुंबईमधून आतापार्यंत 31 हजार 338 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याने मुंबईत सध्या 26 हजार 921 सक्रिय रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचे मुंबईत आज नव्याने 1 हजार 359 रुग्ण आढळून आले आहेत. तर, 77 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांपैकी 53 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. या मृतांमध्ये 59 पुरुष आणि 18 महिलांचा समावेश होता. मृतांमध्ये 7 जणांचे वय 40 वर्षाखाली होते, 43 जणांचे वय 60 वर्षावर तर, 27 जणांचे वय 40 ते 60 वर्षादरम्यान होते. मुंबईमधून आज 298 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळे डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांचा आकडा 31 हजार 338 वर पोहचला आहे. तर, मुंबईतील कोरोनाच्या रुग्णांचा एकूण आकडा 61 हजार 501 वर पोहचला आहे. त्यापैकी 3 हजार 242 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, मुंबईमधून आतापर्यंत 31 हजार 338 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळे मुंबईत सध्या कोरोनाचे 26 हजार 921 सक्रिय रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.