महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईत कोरोनाचे 709 नवे रुग्ण, 873 रुग्णांना डिस्चार्ज, बाधितांचा आकडा 1,18,130 वर - mumbai corona latest news

मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 18 हजार 130 वर पोहचला आहे. तर, मृतांचा आकडा 6 हजार 546 वर पोहचला आहे. मुंबईमधून आज 873 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत एकूण 90 हजार 962 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने सध्या मुंबईत 20 हजार 326 सक्रिय रुग्ण आहेत.

मुंबई कोरोना अपडेट्स
मुंबई कोरोना अपडेट्स

By

Published : Aug 4, 2020, 10:16 PM IST

मुंबई : मुंबईत आज (मंगळवारी) कोरोनाचे 709 नवे रुग्ण आढळून आले असून 56 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 18 हजार 130 वर पोहचला आहे. तर, मृतांचा आकडा 6 हजार 546 वर पोहचला आहे. मुंबईमधून आज 873 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत एकूण 90 हजार 962 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने सध्या मुंबईत 20 हजार 326 सक्रिय रुग्ण आहेत. तर, मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर 77 टक्क्यांवर पोहचला असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 80 दिवसांवर पोहचला आहे.

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूमुळे मुंबईत आज 56 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यापैकी 46 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 39 पुरुष तर 17 महिला रुग्ण आहेत. मुंबईतून आज 873 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामुळे डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांचा आकडा 90 हजार 962 वर पोहचला आहे. मुंबईत कोरोनाचे 1 लाख 18 हजार 130 रुग्ण असून 90 हजार 962 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, 6 हजार 546 रुग्णांचा मृत्यू झाल्याने सध्या 20 हजार 326 सक्रिय रुग्ण आहेत.

मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 77 टक्क्यांवर पोहचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 80 दिवस तर सरासरी दर 0.87 टक्के आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 634 चाळी आणि झोपडपट्टी कंटेन्मेंट झोन घोषित करून सील करण्यात आल्या आहेत. तसेच 5 हजार 616 इमारती व इमारतीच्या विंग, काही मजले सील करण्यात आले आहेत. तर, कोरोनाचे निदान करण्यासाठी 5 लाख 59 हजार 787 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details