मुंबई - येत्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला मोदींचा विसर पडत असल्याचे चित्र दिसत आहे. मागील लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपकडून मोदींच्या नावाचा 'हर हर मोदी, घर घर मोदी' जयघोष केला जात होता. मात्र, येत्या २०१९ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून ज्या नवनवीन घोषणा, घोषवाक्य आणि पत्रकाबाजी काढली जात आहेत, त्यात मोदींना दुय्यम स्थान देण्यात येत असल्याचे दिसत आहे. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
लोकसभा निवडणूक घोषणेत भाजपला 'मोदी' ऐवजी 'परिवार' हवा - लोकसभा
येत्या २०१९ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून ज्या नवनवीन घोषणा, घोषवाक्य आणि पत्रकाबाजी काढली जात आहेत, त्यात मोदींना दुय्यम स्थान देण्यात येत असल्याचे दिसत आहे.
दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची 'परिवार' ही ओळख सांगणारा शब्द भाजपच्या घोषवाक्यात सर्वाधिक वापरल्याचे दिसून आले आहे. मागच्या लोकसभा निवडणुकीत मोदी यांच्या नावाचा जयघोष करत भाजपने सत्ता मिळवली होती. मात्र यावेळी भाजपने मोदींना दुय्यम स्थान देत त्यांना आपल्या घोषवाक्यातून गायब केले असल्याचे समोर आले आहे. नुकत्याच एका घोषवाक्यात भाजपकडून 'मेरा भाजप मेरा परिवार' असे घोषवाक्ये तयार केले आहे. यामुळे विरोधकांना आयतीच संधी मिळाली असून भाजपच्या गोटातही या नवीन घोषवाक्यामुळे उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
मागील साडेचार वर्षांत भाजपमधील केंद्रीय मंत्री, खासदार हे आपल्या मतदार संघातील आणि आपली महत्वाची कामे झाली नसल्याने ती नाराज झाली आहेत. तर दुसरीकडे राफेल, नोटबंदी, जीएसटी आणि बडे उद्योजक देशातील बँकांना आणि सर्वसामान्यांच्या पैशावर डल्ला मारून देशाबाहेर पळून गेल्याने, त्यासाठीचा जाब देणे खासदारांना अवघड झाले आहे. म्हणूनच भाजप बहुतांश ठिकाणी मोदी यांच्या नावाऐवजी 'परिवार' आणि इतर शब्द वापरण्यात येत असल्याचे बोलले जात आहे.