मुंबई- कोरोनाचे रुग्ण मुंबईत वाढत आहेत. घाटकोपर, टिळक रोड इथल्या नीलकंठ विहार सोसायटीत कोरोनाचा रुग्ण आढळला आहे. कोरोनाची तपासणी करण्यासाठी खासगी रुग्णालयांना परवानगी देण्यात यावी. अशी मागणी आज आमदार राम कदम यांनी विधानसभेत केली. मात्र, खासगी हॉस्पिटलला केंद्राच्या परवानगी शिवाय परवानगी देता येणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवेदनावेळी स्पष्ट केले. परंतु, केंद्राने परवानगी द्यावी यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत, असेही त्यांनी सांगितले.
कोरोना व्हायरस: 'केंद्राने परवानगी दिली तरच खासगी रुग्णालयात तपासणी'
इराणमधून आलेल्या भारतीयांना घाटकोपर इथल्या नौदलाच्या डेपोत ठेवण्यात येत आहे. त्यांना या गजबजलेल्या वस्तीत न ठेवता. अन्य ठिकाणी ठेवण्याची मागणी राम कदम केली.
new-patient-of-corona-found-in-ghatkopar-mumbai
हेही वाचा-कोरोना : मास्क अन् सॅनिटायझरचा काळाबाजार; पुण्यातील चार मेडिकल दुकाने सील
तसेच इराणमधून आलेल्या भारतीयांना घाटकोपर इथल्या नौदलाच्या डेपोत ठेवण्यात येत आहे. त्यांना या गजबजलेल्या वस्तीत न ठेवता. अन्य ठिकाणी ठेवण्याची मागणीही कदम यांनी केली.