मुंबई- वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी गुरुवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी राज्यातील वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या परीक्षा १५ जुलैच्यादरम्यान घेण्याची तयारी असून त्यासाठीचा प्रस्ताव आरोग्य विज्ञान विद्यापीठाने दिला असल्याची माहिती राज्यपालांना दिली. परंतु, आज या परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भात मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यामुळे, या परीक्षा आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
वैद्यकीय परीक्षा आणखी लांबणीवर..! एमसीआयने दिल्या नवीन मार्गदर्शक सूचना
वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी गुरुवारी राज्यपालांची भेट घेऊन वैद्यकीय परीक्षा १५ जुलैदरम्यान घेऊ शकतो, असा प्रस्ताव विद्यापीठाने दिला असल्याची माहिती दिली होती. परंतु, सध्याची परिस्थिती लक्षात घेता कौन्सिलच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते, असा इशारा एमसीआयने दिला आहे.
राज्यातील विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करण्यावरून सरकार आणि भाजपामध्ये चांगलेच रण पेटलेले आहे. अशात वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी गुरुवारी राज्यपालांची भेट घेऊन वैद्यकीय परीक्षा १५ जुलैदरम्यान घेऊ शकतो, असा प्रस्ताव विद्यापीठाने दिला असल्याची माहिती दिली होती. परंतु, सध्याची परिस्थिती लक्षात घेता कौन्सिलच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते, असा इशारा एमसीआयने दिला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १२ मेपासून सुरू होणाऱ्या वैद्यकीयच्या परीक्षा सुरूवातीला लांबणीवर पडल्या होत्या. आता त्या १५ जुलैपासून घेण्याचे विद्यापीठाचे नियोजन होते. मात्र, एमसीआयच्या नवीन मार्गदर्शक सूचनांमुळे या परीक्षा पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एमसीआयच्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार विद्यापीठाला आपल्या परीक्षांचे नियोजन नव्याने करावे लागणार आहे. सुरूवातीला पदवीच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा घेऊन नंतर इतर वर्षाच्या परीक्षांचे नियोजन करावे लागेल. त्यासाठी सोशल डिस्टन्सिंगसारख्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे.