मुंबई -कोविड-१९चा प्रसार थांबवण्यासाठी ‘ब्रेक द चेन’मोहिमेअंतर्गत महाराष्ट्र शासनाने काही निर्बंध व मार्गदर्शक तत्वे जाहिर केले आहेत. १ मे २०२१च्या सकाळी सात वाजेपर्यंत हे नवीन नियम लागू असतील. परंतु, राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता, या निर्बंधांमध्ये काही फेरबद्दल करण्यात आले आहेत. साथ रोग कायदा १८९७च्या कलम दोन, तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ च्या तरतुदीनुसार हे बदल करण्यात आले आहेत. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
‘ब्रेक द चेन’ अंतर्गत शासनाचे नवीन निर्बंध व मार्गदर्शक तत्वे जाहीर - ब्रेक द चेन मोहिम नवीन निर्बंध बातमी
गेल्या वर्षभरापासून देेशासह राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. शासन, प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांनी कोरोना आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यात त्यांना यशही आले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. त्यामुळे राज्यात शासनाने कडक निर्बंध लावले आहेत. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी 'ब्रेक द चेन' ही मोहिम राबण्यात आली आहे.
![‘ब्रेक द चेन’ अंतर्गत शासनाचे नवीन निर्बंध व मार्गदर्शक तत्वे जाहीर मुंबई](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-11473755-417-11473755-1618929857543.jpg)
मुंबई
खालील नवीन बदल २० एप्रिल २०२१च्या संध्याकाळी आठ वाजेपासून १ मे २०२१ रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत अस्तित्वात राहतील.
- सर्व किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी आणि मिठाई दुकाने, सर्व खाद्यपदार्थांची दुकाने (चिकन, मटण, कोंबडी, मासे, अंडी), त्याचप्रमाणे कृषी अवजारे व कृषी उत्पादने, पाळीव प्राण्यांच्या खाद्याची दुकाने सकाळी सात वाजेपासून अकरा वाजेपर्यंत सुरू राहतील.
- या दुकानांमधून घरपोच सेवा देण्यासाठी सकाळी 7 वाजेपासून संध्याकाळी 8 वाजेपर्यंत परवानगी असेल. परंतु, आवश्यक वाटल्यास स्थानिक प्रशासन या वेळांमध्ये फेरबदल करू शकते.
- स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाला वाटल्यास कलम दोन अंतर्गत काही गोष्टींना व सेवांना, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची संमती घेऊन आवश्यक सेवा म्हणून घोषित करू शकते.
- या आदेशामध्ये नमूद केलेल्या गोष्टीं व्यतिरिक्त इतर सर्व अटी व नियम 13 एप्रिल 2021 रोजी राज्य शासनाद्वारे जाहीर करण्यात आलेल्या पत्रकानुसारच असतील.
Last Updated : Apr 20, 2021, 8:27 PM IST