महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईत 2434 रुग्णांची एकाच दिवशी कोरोनावर मात तर 1144 नवीन रुग्णांची भर

आतापार्यंत डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 37 हजार 10 वर पोहचली आहे. मुंबईत सध्या 28 हजार 653 सक्रिय रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

Mumbai covid 19
मुंबई कोरोना अपडेट

By

Published : Jun 25, 2020, 8:17 AM IST

मुंबई - जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचे मुंबईत बुधवारी नवे 1 हजार 144 रुग्ण आढळून आले असून, 120 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 69 हजार 625 वर पोहचला आहे. तर मृतांचा आकडा 3 हजार 962 वर पोहचला आहे. मुंबईमधून बुधवारी एकाच दिवशी 2 हजार 434 रुग्ण बरे झाले आहेत.

आतापार्यंत डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 37 हजार 10 वर पोहचली आहे. मुंबईत सध्या 28 हजार 653 सक्रिय रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

मुंबईत बुधवारी कोरोनाचे नव्याने 1 हजार 144 रुग्ण आढळून आले आहेत. तर 120 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 38 मृत्यू गेल्या 48 तासांमधील आहेत. तर 82 मृत्यू 48 तासांपूर्वीचे आहेत. 120 मृत्यूपैकी 76 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 73 पुरुष आणि 47 महिला रुग्ण होत्या. मृतांमध्ये 8 जणांचे वय 40 वर्षाखाली होते, 74 जणांचे वय 60 वर्षावर तर 38 जणांचे वय 40 ते 60 वर्षादरम्यान होते.

मुंबईमधून बुधवारी 2 हजार 434 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांचा आकडा 37 हजार 10 वर पोहचला आहे. मुंबईतील कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचा दर 50 टक्क्यांवर पोहचला आहे. 17 ते 23 जूनपर्यंत रुग्ण वाढीचा दर 1.81 टक्के इतका आहे. मुंबईमधील रुग्ण दर वाढीचा दर 39 दिवसांवर पोहचला आहे.

मुंबईत सध्या ज्या विभागात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत अशा 765 चाळी आणि झोपडपट्टी असलेले विभागात कंटेनमेंट झोन म्हणून सील करण्यात आले आहेत. तर कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 6 हजार 116 इमारतीमधील काही माळे, काही विंग तर काही इमारती पूर्ण सील करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details