मुंबई - शहरात आज कोरोनाचे नवे १,२७४ रुग्ण आढळून आले असून ५७ जणांचा मृत्यू झाला आहे. या नवीन रुग्णांसह मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा ४७,१२८ वर तर मृतांचा आकडा १,५७५ वर पोहचला आहे.
दिलासादायक.. आज १,१८१ मुंबईकरांनी केली कोरोनावर मात - कोरोना पेशंट मुंबई
मुंबईत आज कोरोनाचे १,२७४ रुग्ण आढळले आहेत. तर ५७ जणांचा म्रृत्यू झाला आहे.
मुंबईमधून आज एकाच दिवशी १,१८१ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण बरे होण्याची ही पहिलीच वेळ आहे. शहरात आतापर्यंत १९,९७८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून सध्या २५,५७५ सक्रिय रुग्ण आहेत.
मृतांपैकी ३९ रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये ३४ पुरुष आणि २३ महिला रुग्ण होत्या. मृतांमध्ये ७ जणांचे वय ४० वर्षाखाली होते, २१ जणांचे वय ६० पेक्षा अधिक होते. तर २९ जणांचे वय ४० ते ६० वर्षादरम्यान होते. मुंबईतून आज १,१८१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आले. यामुळे डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांचा आकडा १९,९७८ वर पोहचला आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.