मुंबई:महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची वाढ सुरूच आहे. 14 एप्रिलपर्यंत महाराष्ट्रात 80 लाख 126 लोक उपचारानंतर बरे झाले आहेत. राज्यात कोरोनामधून बरे होण्याचा दर 98.11 टक्के आहे. दाखल झालेल्या रूग्णांपैकी 30 टक्के रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. तर मुंबईत सर्वाधिक सक्रिय रुग्णांची संख्या आहेत. मुंबईत 1634 कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. ठाण्यात 1056 सक्रिय रुग्ण आहेत.
राज्यात इतके सक्रिय रुग्ण: राज्यात शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशी एक हजारावर कोरोना रुग्णांची नोंद झाली. बुधवारी १११५, गुरुवारी १०८६ तर आज ११५२ रुग्णांची नोंद झाली आहे. काल बुधवारी ९, गुरुवारी १ रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली होती. शुक्रवारी ४ कोरोना रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात गेल्या २४ तासात ११५२ रुग्णांची तर ४ मृत्यूंची नोंद झली आहे. ९२० रुग्ण बरे झाले आहेत. मार्च २०२० पासून आतापर्यंत ८१ लाख ५४ हजार ५२९ रुग्णांची तर १ लाख ४८ हजार ४७५ मृत्यूची नोंद झाली आहे. ८० लाख १२६ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात कोरोनाचे ५९२८ सक्रिय रुग्ण आहेत. त्यामधील मुंबईत १६४३, ठाणे १०५६, पुणे ७४७, नागपूर ७७९, रायगड २५४, पालघर १८३, सांगली १८०, सोलापूर १३३, उस्मानाबाद १३३ सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे.