मुंबई - राज्यात आज (7 फेब्रुवारी) रुग्ण संख्येत कमालीची घट (Corona Update on 7 February) दिसून येत आहे. आज केवळ सहा हजार नवे रुग्ण (New Corona Cases in Maharashtra) सापडले आहेत. तर, 24 जणांचा मृत्यू झाला आहे. ओमायक्रॉनचा आज एकही रुग्ण आढळून आला नाही, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
- राज्यात कोरोना नियंत्रणात -
जानेवारी महिन्यात वाढलेला कोरोनाचा प्रादुर्भाव सध्या नियंत्रणात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत कमालीची घट झाली आहे. सक्रिय रुग्णांचे प्रमाण कमी झाले असून आरोग्य विभागाने सुटकेचा निःस्वाश टाकला आहे. आज 6 हजार 436 नव्या बाधितांची नोंद झाली. त्यापैकी 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूदर 1.83 टक्के इतका स्थिर स्थावर आहे. 18 हजार 421 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत 75 लाख 57 हजार 34 करोना बाधित बरे झाले आहेत. बरे होणाऱ्या बधितांचे प्रमाण यामुळे 96.76 टक्के इतके आहे. 7 कोटी 56 लाख 55 हजार 12 कोविड चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी 10.32 टक्के इतके म्हणजेच 78 लाख 10 हजार 136 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6 लाख 73 हजार 875 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 2338 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 1 लाख 6 हजार 59 कोरोना सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
- ओमायक्रॉनचा आज एकही रुग्ण नाही -