महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Maharashtra Corona Update : राज्यात शुक्रवारी 13 हजार 840 नवे बाधित; 28 हजार डिस्चार्ज

राज्यात आज(4 फेब्रुवारी) 13 हजार 840 नवीन कोरोना रुग्णांची नोंद (New Corona Cases on 4 Feb) झाली आहे. तर, 81 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आज 27 हजार 891 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात (Maharashtra Corona Update) कोरोना आटोक्यात आला असून रुग्णसंख्येत कमालीची घट दिसून आली आहे.

maharashtra corona update
महाराष्ट्र कोरोना अपडेट

By

Published : Feb 4, 2022, 10:19 PM IST

Updated : Feb 4, 2022, 10:39 PM IST

मुंबई - राज्यात आज(4 फेब्रुवारी) 13 हजार 840 नवीन कोरोना रुग्णांची नोंद (New Corona Cases on 4 Feb) झाली आहे. तर, 81 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आज 27 हजार 891 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

हेही वाचा -Rajesh Tope On Third Wave : राज्यातील निर्बंध कमी करण्याकडे कल; मार्चमध्ये तिसरी लाट संपेल - राजेश टोपे

राज्यात (Maharashtra Corona Update) कोरोना आटोक्यात आला असून रुग्णसंख्येत कमालीची घट दिसून आली आहे. तर, दुसरीकडे बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या दुप्पट होत आहे. आज ओमायक्रॉनचा एकही बाधित आढळून आलेला नाही.

  • ओमायक्रॉनचा आज एकही बाधित नाही -

राज्यात बुधवारी ओमायक्रॉनचे 113 नवे रुग्ण सापडले होते. मात्र, गुरुवारी आणि आज एकही रुग्ण आढळून आलेला नाही. आजपर्यंत 3 हजार 334 एवढे रुग्ण आहेत. तर, 1 हजार 929 जणांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्याने सर्वांना घरी सोडण्यात आले आहे.

  • मुंबईत ८४६ नव्या रुग्णांची नोंद, ७ जणांचा मृत्यू

डिसेंबर महिन्यापासून मुंबईत कोरोना विषाणूची तिसरी लाट आली. ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजारच्यावर रुग्ण ( Corona cases in Jan 2022 ) आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होत आहे. मागील आठवड्यात सोमवार ते बुधवार असे सलग तीन दिवस १८०० च्यावर रुग्ण आढळून आले. त्यात घट होऊन सोमवारी ९०६, मंगळवारी ८०३, बुधवारी ११२८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यात पुन्हा घट होऊन ८२७ तर आज ८४६ रुग्णांची नोंद झाली आहे. आज ७ मृत्यूची नोंद ( Corona patient deaths in Mumbai ) झाली आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचा ( corona recovery rate in Mumbai ) दर ९७ टक्के तर ७१३५ सक्रिय रुग्ण ( Mumbai Corona Update on 4th feb 2022 )आहेत.

हेही वाचा -Mumbai Corona Update : मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी ८०० च्या वर रुग्ण, ८४६ नव्या रुग्णांची नोंद, ७ जणांचा मृत्यू

  • राज्यातील निर्बंध कमी करण्याकडे कल; मार्चमध्ये तिसरी लाट संपेल - राजेश टोपे

आता कोरोनाची रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. मुंबई-पुण्यातही संख्या कमी होत आहे. काही जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत असली तरी ती पुन्हा खाली येईल. आता निर्बंध वाढवण्याऐवजी कमी करण्याकडे राज्य शासनाचा कल आहे अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे ( Rajesh Tope On Third Wave ) यांनी दिली. ते जालन्यात बोलत होते. मुंबई, पुणे आणि ठाण्यासारख्या शहरातील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. याच आधारावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तिसरी लाट संपेल ( Health minister on corona ) असे सांगितले.

Last Updated : Feb 4, 2022, 10:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details