महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Maharashtra Corona Update : कोरोना रुग्णांमध्ये घट; गुरुवारी 467 नवे बाधित

आज (3 मार्च) राज्यात दिवसभरात 467 नव्या कोरोना रुग्णांची नोंद (New Corona Cases) झाली आहे. तर 12 जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात 1144 रुग्ण बरे झाले (Corona Discharged) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.6 टक्के असून, आजपर्यंत 77 लाख 14 हजार 719 रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत.

maharashtra corona file photo
महाराष्ट्र कोरोना फाईल फोटो

By

Published : Mar 3, 2022, 8:39 PM IST

Updated : Mar 3, 2022, 9:06 PM IST

मुंबई -राज्यात कोरोना रुग्णसंख्येत घट होताना (Maharashtra Corona Update) दिसत आहे. आज (3 मार्च) राज्यात दिवसभरात 467 नव्या कोरोना रुग्णांची नोंद (New Corona Cases) झाली आहे. तर 12 जणांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे राज्यात आज ओमायक्रॉनचे 234 रुग्ण सापडले आहेत. हे सर्व रुग्ण मुंबईतील आहेत.

कोरोना रुग्णसंख्येचा आलेख उतरतो -

राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येचा आलेख उतरतो आहे. आज रुग्ण संख्येत मोठी घट झाल्याचे दिसून येत आहे. दिवसभरात 467 जणांना संसर्गाची बाधा झाली आहे. तर 12 जणांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी राज्यात शून्य मृत्यूची नोंद झाली होती. मात्र, मृत्यू दर 1.82 टक्के इतका स्थिरस्थावर आहे. दिवसभरात 1144 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.6 टक्के असून, आजपर्यंत 77 लाख 14 हजार 719 रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत.

4 हजार 953 कोरोना सक्रिय रुग्ण -

आजपर्यंत 7 कोटी 80 लाख 65 हजार 969 कोरोना चाचण्या केल्या. त्यापैकी 10.8 टक्के इतके म्हणजेच 78 लाख 67 हजार 319 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 42 हजार 118 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 602 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 4 हजार 953 कोरोना सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

ओमायक्रॉनचे 234 रुग्ण -

गेल्या दोन दिवसांपासून ओमायक्रॉनचे रुग्ण सापडत आहेत. मंगळवारी 104 रुग्ण सापडले होते. तर बुधवारी 38 नव्या बाधितांची भर पडली होती. मात्र, आज हा आकडा वाढला असून 234 बाधितांची नोंद झाली आहे. हे सर्व रुग्ण मुंबईतील आहेत. आजपर्यंत 5 हजार 5 एवढे रुग्ण आहेत. त्यापैकी 4629 जणांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्याने सर्वांना घरी सोडण्यात आले. आजपर्यंत 9382 जणांची जनुकीय चाचणी केली. 8714 चाचण्याचे अहवाल प्राप्त झाले असून 668 नमुने प्रलंबित आहेत, असे आरोग्य विभागाने सांगितले आहे.

विभागात सर्वाधिक कोरोना रुग्ण -

मुंबई महापालिका - 80

ठाणे - 6

ठाणे मनपा - 14

नवी मुंबई पालिका - 12

कल्याण डोबिवली पालिका - 4

मीरा भाईंदर - 1

वसई विरार पालिका - 3

नाशिक - 20

नाशिक पालिका - 10

अहमदनगर - 38

अहमदनगर पालिका - 11

पुणे - 22

पुणे पालिका - 80

पिंपरी चिंचवड पालिका - 22

सातारा - 13

नागपूर मनपा - 17

Last Updated : Mar 3, 2022, 9:06 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details