मुंबई :राज्यात बुधवारी 2138 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर (New Corona Cases in Maharashtra) पडली आहे. तर दिवसभरात एकूण 2269 रुग्ण कोरोनामुक्त (Corona Patients Discharged) होऊन घरी परतले आहेत. बुधवारी नोंद झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे पुणे जिल्ह्यातील आहेत. तसेच मुंबईतही कोरोना रुग्णांची संख्या आता कमी झाली आहे. त्यामुळे पालिकेनेही जम्बो कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात एकूण 13943 सक्रिय रुग्ण आहेत.
Maharashtra Corona Update : राज्यात बुधवारी 2138 नवे कोरोनाबाधित; 8 मृत्यू - महाराष्ट्र कोरोना अपडेट
राज्यात बुधवारी 2138 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर (New Corona Cases in Maharashtra) पडली आहे. तर दिवसभरात एकूण 2269 रुग्ण कोरोनामुक्त (Corona Patients Discharged) होऊन घरी परतले आहेत. बुधवारी नोंद झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे पुणे जिल्ह्यातील आहेत.
राज्याची कोरोनाची आकडेवारी - राज्यात आज आठ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.84 टक्के इतका आहे. तर आतापर्यंत राज्यामध्ये 78,77,288 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97.98 टक्के इतकं झाले आहे.
देशातील कोरोनाची आकडेवारी - गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 18 हजार 313 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. या काळात 57 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यासह कोरोना विषाणूची लागण झालेले 20 हजार 742 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाख 45 हजार 26 आहे. काल (मंगळवार) देशात 14 हजार 830 कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून आले होते, तर या काळात 36 जणांचा मृत्यू झाला होता.