महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Corona Cases : राज्यात ११०० नवे कोरोनाबाधित; ४ रुग्णांचा मृत्यू - महाराष्ट्र कोरोना आकडेवारी 19 एप्रिल 2023

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या कधी कमी तर कधी वाढताना दिसत आहे. बुधवारी(19 एप्रिल) राज्यात 1100 नवे कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, तर 48 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच 48 रु्ग्ण सध्या आयसीयुमध्ये दाकळ आहेत.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Apr 19, 2023, 7:40 PM IST

Updated : Apr 20, 2023, 10:34 AM IST

मुंबई - राज्यात १२ ते १४ एप्रिल दरम्यान १ हजाराहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर रुग्ण संख्या घटली होती. आज पुन्हा रुग्णसंख्येत वाढ होऊन ११०० रुग्ण आढळून आले आहेत. तसेच आज ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज ११०० रुग्ण आढळून आले असले तरी १११२ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या ६११८ ॲक्टीव्ह रुग्ण आहेत. त्यापैकी २८८ रुग्ण रुग्णालयात दाखल असून ४८ रुग्ण आयसीयुमध्ये दाखला आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्यात ११०० रुग्णांची नोंद -राज्यात आज ११०० रुग्णांची नोंद झाली आहे. ४ रुग्णांचा मृत्यू झाला असून १११२ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात आतापर्यंत कोरोनाचे एकूण ८१ लाख ५८ हजार ३९३ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ८० लाख ३ हजार ८०२ रुग्ण बरे झाले आहेत तर १ लाख ४८ हजार ४८९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आज १६,८२९ चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी १३,४०९ चाचण्या सरकारी प्रयोगशाळेत, ३०७६ चाचण्या खासगी प्रयोगशाळेत तर ३४४ चाचण्या सेल्फ टेस्ट करण्यात आल्या आहेत. राज्यात XBB 1.16 व्हरियंटचे ६८१ रुग्ण आढळून आले असून ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

साडेतीन महिन्यात ७२ मृत्यू -१ जानेवारीपासून आजपर्यंत गेल्या साडेतीन महिन्यात कोरोनामुळे ७२ मृत्यू झाले असून त्यामधील ६० वर्षांवरील नागरिकांचे ७३.६१ टक्के मृत्यू झाले आहेत. इतर आजार असलेल्या नागरिकांचे ६९ टक्के मृत्यू झाले आहेत. १० टक्के मृत्यू सहबाधित नसलेल्या नागरिकांचे झाले आहेत तर २१ टक्के मृत्यू हे कशामुळे झाले याची माहिती नसल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे.

४६ रुग्ण गंभीर -राज्यात १८ एप्रिल रोजी ६११८ सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी ५८३० म्हणजेच ९५.३ टक्के रुग्ण गृह विलागिकरणात आहेत. २८८ टक्के ४.७ टक्के रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. २४० म्हणजेच ३.९ टक्के रुग्ण सर्वसाधारण वार्डमध्ये उपचार घेत आहेत तर ४८ म्हणजेच ०.८ टक्के रुग्ण आयसीयुमध्ये उपचार घेत आहेत.

या दिवशी सर्वाधिक रुग्णांची नोंद -

  • १२ एप्रिल ११२५
  • १३ एप्रिल १०८६
  • १४ एप्रिल ११५२
  • १९ एप्रिल ११००

हेही वाचा -Corona Virus : अबब! मागील तीन वर्षात कोरोनामुळे तब्बल 'इतके' करोड लोकं होते क्वारंटाईन

Last Updated : Apr 20, 2023, 10:34 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details