मुंबई- नायर रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक ७ मधून गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान ५ दिवसांच्या एका नवजात बाळाची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. रुग्णालयातून बाळ चोरी करणारी महिला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
मुंबईच्या नायर रुग्णालयातून पाच दिवसांचे बाळ चोरीला - nayar hospital
नायर रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक ७ मधून गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान ५ दिवसांच्या एका नवजात बाळाची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे.
या संदर्भात आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून बाळ चोरणाऱ्या आरोपी महिलेचा पोलीस शोध घेत आहेत. नायर रुग्णालयात ५ दिवसांपूर्वी शीतल साळवी या महिलेने बाळाला जन्म दिला होता. गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास एक ३५ ते ४० वर्षांची महिला या बाळाला हातात घेऊन घाई गडबडीने नायर रुग्णालयाच्या बाहेर जाताना दिसत आहे.
आग्रीपाडा पोलिसांनी बाळाचा शोध घेण्यासाठी ३ पथके तयार केली आहेत. नायर रुग्णालय परिसर व आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपी महिलेचा शोध घेतला जात आहे.