मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि महापालिका मुख्यालय परिसरात अनेक पर्यटक या ठिकाणी असलेल्या सेल्फी पॉईंटवर येत असतात. मात्र, याठिकाणी पर्यटकांसाठी बसण्यासाठी आणि चालण्यासाठी रस्ता नव्हता. आता यावर पर्याय काढत पालिकेतर्फे काही रस्ता राखीव करण्यात आला आहे. तसेच डांबरी रस्त्यांना पिवळ्या रंगाने रंगविण्यात आले आहे. त्यामुळे डांबरी काळ्या रस्त्यांना सोन्याची झळाळी मिळाल्याचा भास होतो. याशिवाय लोकांना चालण्यासाठी हक्काची जागाही मिळाली आहे.
एका बाजूला बृह्न्मुंबई महापालिका तर दुसऱ्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मध्यभागी सेल्फी पॉइंट सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या तीनही ठिकाणच्या कडेला पिवळ्या रंगाच्या पट्ट्या मारून पिवळा रस्ता तयार करण्यात आला आहे. या पिवळ्या रंगाला पुरातन वस्तू समितीकडून मंजुरी देण्यात आली आहे.