मुंबई - गेले काही दिवस कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढली होती. रोज 7 ते 11 हजारांच्यावर रुग्ण आढळून येत होते. मात्र, आता त्यात घट झाली आहे. मुंबईत आज 794 नवे रुग्ण आढळून आले आहेत. आज 20 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 833 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण दुप्पटीचा कालावधी 527 दिवसांवर पोहोचला आहे.
आज 833 रुग्णांना डिस्चार्ज
मुंबईत आज 794 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 7 लाख 11 हजार 601 वर पोहोचला आहे. आज 20 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 15 हजार 048 वर पोहोचला आहे. 833 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 6 लाख 78 हजार 278 वर पोहोचली आहे.
मुंबईत 112 इमारती सील
मुंबईत सध्या 16 हजार 70 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95 टक्के आहे. तर रुग्ण दुप्पटीचा कालावधी 527 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 27 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेन्मेन्ट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर 112 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आज 26 हजार 758, तर आतापर्यंत एकूण 64 लाख 25 हजार 423 चाचण्या करण्यात आल्या. याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
रुग्ण उतार सुरूच
1 मे - 3908
2 मे - 3672
3 मे - 2662
4 मे - 2554
5 मे 3879
6 मे - 3056
7 मे - 3039
8 मे - 2678
9 मे - 2403
10 मे - 1794
11 मे - 1717
12 मे - 2116
13 मे - 1946.
14 मे - 1657
15 मे - 1447
16 मे - 1544